Shocking: कुत्र्यावरुन मुलगा-वडिलांमध्ये तुफान राडा, दोघांनी एकमेकांवर झाडल्या गोळ्या
Shooting (Photo Credits: ANI | Representational Image)

शेजारच्यांना आपण काही वेळेस पाळीव कुत्र्यावरुन भांडण करताना पाहिले असेल. तसेच वडिलांसोबत ही आपल्या मुलाचे कुत्र्यावरुन भांडण होते. परंतु साध्या पाळीव कुत्र्यावरुन एकमेकांना गोळ्या झाडण्यापर्यंतचे भांडण कधीच पाहिले नसले ना कधी ऐकले असले. मात्र हे खरं आहे. कारण अशीच एक हैराण करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. या घटनेत मुलगा आणि वडिलांचे कुत्र्यावर भांडण झाल्याने त्यांनी एकमेकांना गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मध्ये भांडण तर राहिले दूरच पण एकमेकांचा जीव गेला आहे.(Street Dog Viral Video: चोराने हिसकावली महिलेची पर्स; स्ट्रीट डॉगने चोराला शिकवला 'असा' धडा; पहा व्हायरल व्हिडिओ)

मेट्रो यांनी दिलेल्या बातमीनुसार, वादाचे कारण लहान मुलगा Kelvin Jr होता. त्याने आपले वडिल Kelvin Coker Sr यांच्या कुत्र्याची हत्या केली होती. केल्विन एकच नव्हे तर दुसऱ्या कुत्र्याचा ही जीव घेतला होता. यामुळे केल्विच कोकर आपल्या मुलावर नाराज होते. मुलाच्या गर्फ्रेंडवर कुत्र्याने हल्ला केला होता म्हणून त्याने त्यांची हत्या केली होती. याच कारणामुळे तो अत्यंत दु:खी होता. त्यानंतर त्याने कुत्र्याला ही गोळी मारत ठार केले. कुत्र्यामुळे मुलगा आणि वडिलांमध्ये वाद कायमच होता.(फ्लोरिडातील रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये दिसू शकतो अजगर; जर चाचणीदरम्यान ते खाणे सुरक्षित आढळले तर घेतला जाणार निर्णय)

याच दरम्यानच्या दिवसात दोघांची Alabama मधील Wagersville येथे भेट झाली त्यावेळी त्यांच्यामधील वाद अधिक चिघळला. दोघांमध्ये झटापट ही झाली. याच वेळी वडिलांनी आणि मुलाने आपल्याकडील बंदुकी काढल्या. तर वडिलांनी प्रथम आपल्या मुलावर गोळी झाडल्याने त्याने सुद्धा तेच केले. या घटनेत दोघे ही जखमी होत त्यांचा अखेर मृत्यू झाला.