Street Dog Viral Video: चोराने हिसकावली महिलेची पर्स; स्ट्रीट डॉगने चोराला शिकवला 'असा' धडा; पहा व्हायरल व्हिडिओ
Street Dog Viral Video (Photo Credit - Twitter)

Street Dog Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपण यापूर्वीही कुत्र्याच्या निष्ठेच्या अनेक कथा तसेच व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, नुकताचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका स्ट्रीट डॉगने महिलेची मदत करुन मानवतेचे एक उदाहरण दिले आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बाजारातून घरी जात आहे. एक तरुण या महिलेचा पाठलाग करत आहे. त्यानंतर काही वेळातचं तो या महिलेची पर्स हिसकावतो. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर रस्त्यावर उभा असलेला कुत्रा या चोरावर हल्ला करतो. त्यानंतर चोर कुत्र्यापासून आपली सुटका करण्यासाठी महिलेची पर्स त्याठिकाणी टाकून पळ काढतो.

दरम्यान, ही महिला रस्त्यावरील कुत्र्याची निष्ठा पाहून अत्यंत खूश होते. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना सुशांत नंदा यांनी 'आपण या भटक्या कुत्र्याला काय म्हणाल?' असा प्रश्न केला आहे. (हेही वाचा  - Viral Video: जंगली घोड्यांनी चोरले Baby Stroller; फ्लोरिडामधील विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाखहून अधिक जणांनी पाहिला आहे. त्याच वेळी, 5 हजार यूजर्संनी या व्हिडिओला लाईक्स केले आहे. काहींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना स्ट्रीट डॉगचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, य बहादूर कुत्र्याचा सन्मान करा. तसेच दुसर्‍या एका युजर्सने म्हटलं आहे की, आपण त्याला स्ट्रीट म्हणू शकत नाही, कारण तो स्निफर डॉग आहे.