Scary Photos: नातीच्या पाळण्याजवळ रहस्यमय आकृती दिल्याने महिला हैराण; फोटोज व्हायरल
Scary Photo (Photo Credits: Facebook)

Scary Photos: अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नातीच्या पाळण्याजवळ एक रहस्यमय आकृती दिसल्याने एक महिला हैराण झाली आहे. टोरी मैकेंजी (Tory McKenzie) असे या महिलेचे नाव असून ती लास वेगास येथे राहते. या महिलेच्या मुलाच्या घरात एक मोशन अॅक्टिव्हेटेड कॅमेरा आहे. यात तिला तिची नात अंबर एका रहस्यमय आकृतीशी बोलत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ती अचंबित झाली आहे. दरम्यान, या घटनेमागील गूढ उकलण्यासाठी पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सची मदत घेतली जात आहे. यातील रहस्यमय आकृतीचा फोटो महिलेने फेसबुकवर शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून हा फोटो पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

कॅमेऱ्यामध्ये खोलीतील सर्व घटना रेकॉर्ड झाल्या आहेत. मात्र त्यात काहीही रहस्यमय असे दिसून आले नाही. मात्र टोरी ने सांगितले की, नातीच्या पाळण्याजवळ एक रहस्यमय आकृती दिसल्याने मी खूप घाबरले. ती आकृती अगदी तिच्या नातीच्या पाळण्याच्या बाजूला होती. तिच्या डोक्यावर शिंग होते आणि तिचे पंजे लांब होते.

पहा फोटोज:

ती रहस्यमय आकृती अत्यंत भयंकर होती. तिच्या डोक्यावरील  शिंगांमुळे ती दानवाप्रमाणे भासली. माझ्या मुलाला मी हा व्हिडिओ दाखवल्यानंतर तो ही घाबरला. मात्र तिची दोन वर्षांची मुलगी या रहस्यमय आकृतीला घाबरत नाही. तिला ती तिची मैत्रिण वाटते, असे टोरीने सांगितले.

व्हायरल होणारे हे फोटोज पाहिल्यानंतर टोरीला पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सची मदत घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसंच काहीजण राहते घर सोडण्याचेही सुचवत आहेत. विशेष म्हणजे हे फोटोज पाहून यामागील वास्तव काय असेल? असा प्रश्न सोशल मीडिया युजर्संना पडला आहे.