Fake News Alert: SBI ग्राहकांना येत आहेत YONO अकाउंट ब्लॉक केल्याचे खोटे मेसेज; PIB Fact Check ने केला 'हा' खुलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

कोरोना वायरस जागतिक महामारी आणि लॉकडाऊन मुळे अनेकांचे व्यवहार आता ऑनलाईन झाले आहेत. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळत असलं तरीही त्यामधून होणार्‍या फसवणूकीचं देखील प्रमाण वाढलं आहे. सध्या एसबीआय (SBI)  च्या योनो अ‍ॅप (YONO App) च्या नावाने देखील खोटे मेसेज पाठवले जात आहे. सध्या वायरल मेसेज मध्ये ग्राहकांना ' तुमचं योनो अ‍ॅप ब्लॉक करण्यात आलं आहे. कृपया सोबत दिलेल्या लिंक मध्ये पॅन कार्ड क्रमांक अपडेट करा' असा मेसेज पाठवला जात आहे. दरम्यान हा खोटा मेसेज आहे. सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक कडून या मेसेज मागील सत्यता तपासण्यात आली असून हा मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. नक्की वाचा: आता डेबिट कार्डशिवाय SBI ATM कार्डमधून काढा पैसे, YONO कॅश सेवेचा अशा पद्धतीने उपयोग करा.

दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक ने दिलेल्या माहितीमध्ये एसबीआय अशा प्रकारचे मेसेज पाठवत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच तुमचे बॅंकिंग डिटेल्स मागितले असतील अशा इमेल किंवा मेसेजेसला प्रत्युत्तर देऊ नका असे देखील सांगण्यात आले आहे. तुम्हांला असे मेसेज मिळाल्यास phishing@sbi.co.in या इमेल आयडीवर तक्रार नोंदवा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेक

मागील काही दिवसांमध्ये सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ झाली आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करणारे मेसेज पाठवून किंवा आकर्षक ऑफर्सचं आमिष दाखवून वैयक्तिक माहिती विचारली जाते त्यामधून आर्थिक फसवणूक केली जाते. म्हणूनच अशा फसव्या मेसेजेस पासून दूर राहण्याचं आवाहन केले जात आहे.