Delhi Assembly Elections 2020: सपना चौधरी यांनी दिल्लीच्या जनतेला विचारले कोणाला मत देणार?, लोक म्हणाले 'केजरीवाल' (Video)
सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Assembly Elections 2020) निवडणूक ऐन भरात आला असून, आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांनी जनमताचा कौल खेचण्यासाठी जोर लावला आहे. या तिन्ही पक्षांचे नेते आपापल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचत आहेत. दरम्यान, अशाच एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मते मागणाऱ्या भाजप ( (BJP) नेत्या सपना चौधरी (Sapna Choudhary) यांना दिल्लीच्या जनतेने असे काही उत्तर दिले की, ज्यामुळे सपना चौधरी यांच्यासह व्यासपीठावरील भाजप नेते निरुत्तर झाले.

आपल्या खास नृत्यामुळे प्रेक्षकांची मनं जिकणाऱ्या सपना चौधरी या हरियाणातील प्रसिद्ध गायिका आणि डान्सर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपला पाठिंबा देताना दिसल्या आहेत. दरम्यान, भाजपही निवडणूक प्रचारासाठी त्यांना बोलवत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही सपना चौधरी भाजप प्रचार करत आहेत. दरम्यान, दिल्ली येथील घोंडा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा प्रचरा करताना सपना चौधरी यांनी लोकांना आवाहन केले की, इव्हीएम मशिनवर असलेल्या कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपला विजयी करा. याच वेळी सपना चौधरी यांनी विचारले की, आपण मत कोणाला देणार..? उत्स्फूर्तपणे लोक म्हणाले 'केजरीवाल...'

ट्विट

सपनाच चौधरी यांना लोकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसते की, सपना चौधरी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मत मागत आहेत. त्या लोकांना विचारत आहेत मत कोणाला देणार लोक म्हणतात केजरीवाल. लोकांच्या उत्तराने धक्का बसलेल्या सपना यांनी पुन्हा एकदा लोकांना विचारले कोणाला मत देणार तरीही लोक म्हणाले केजरीवाल. दरम्यान, लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, सपना चौधरीच्या अदांनी बीड-परळीकर घायाळ; उतावीळ प्रेक्षकांचा मंडपांच्या खांबावर ठिय्या (व्हिडिओ))

ट्विट

दरम्यान, दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. तर, 11 फेब्रुवारी या दिवशी मतमोजणी होत आहे. सर्वच राजकी पक्षांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएए) , बेरोजगारी, जातियता आणि यांसह विविध मुद्दे निवडणूक प्रचारात अग्रेसर आहेत. सर्व पक्षांनी जोर लावला असला तरी दिल्लीकर जनता कोणाला कोल देते हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.