
आयुष्मन खुराना याचा मध्यंतरी आलेल्या 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) चित्रपटाचे खास करुन त्या चित्रपटात त्याने काढलेल्या मुलीच्या आवाजाचे अनेक लोक चाहते झाले असतील. परंतू, जोधपुर (Jodhpur) येथील एका युवकाने खरोखरच मुलीचा मादक आवाज काढून अनेकांना गंडा घातला आहे. सोशल मीडिया (Social Media) प्रभावीपणे वापरत हा तरुण चक्क अनेकांसाठी 'ड्रीम गर्ल' ठरला. इतका की, सोशल मीडियावरील या ड्रीम गर्लच्या प्रेमात अनेक जण फसले. एका तरुण व्यापाऱ्याला तर चक्क 50 लाख रुपयांना चुना (Fraud) लागाल. सोळ मीडियावर 'संजना' (Sanjana Siddharth Patel नावाने वावरत असलेल्या या तरुणाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. 'हॅलो, मी संजना बोलते आहे...' हे खास वाक्य अनेकांच्या काळजात घर करुन गेले. इथूनच सुरुवात झाली एका मोठ्या फसवणुकीची.
जोधपूर पोलिसांच्या सीएचबी शाखेने या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात एका अशा युवकाला अटक करण्यात आली जो, मुलीचा आवाज काढूण आणि मुलगी बनून अनेकांना गंडा घालत होता. हा युवक गेली दोन वर्षे संजना नावाची मुलगी बनून ववरत होता. तो जोधपूर येथील एका तरुणासोबत अत्यंत मादक आवाजात गोड बोलत असे. जसे एखादे प्रियकर-प्रेयसी बोलतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवक उत्तर प्रदेश राज्यातील आहे. तो सोशल मीडियावर संजना नावाने ववरत असे. संजनाच्या प्रेमात एक तरुण फसला. इतका की दोन वर्षात त्याने या मुलीवर (संजना) 50 लाख रुपये उधळले. शेवटी फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच या तरुणाला धक्का बसला. संजनाच्या जाळ्यात फसणारा हा तरुण पेशाने व्यापारी असलयाचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, संजना नामक युवक मध्य प्रदेश राज्यातील हरदा जिल्ह्यातील रहविवासी असून, त्याचे खरे नाव सिद्धार्थ पटेल असे आहे. हा युवक फेसबुकवर संजना नावाने वावरत असे. त्यासाठी फेसबुकवर त्याने संजना नावाचे एक तोतया खातेही उघडले होते. त्याने जोधपूर (राजस्थान) येथे राहणाऱ्या रवि इनाणिया नामक तरुणाशी फेसबुकवरुन दोस्ती केली. त्याने रवि यासा संजना या नावाने ओळख करुन दिली. संजना नामक युवकाने रिव यास फेसबुकवर Hi असा मेसेज पाठवला. पण, या Hi ला प्रतिसाद देणाऱ्या रवि इनाणिया याला कुठे माहिती होते पुढे हीच Hi त्याच्या आयुष्यालाही हाय लावणार होती. (हेही वाचा, धक्कादायक! खोटी लग्न लावून तब्बल 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री; वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त)

या विचित्र प्रकरणाबाबत माहिती अशी की, आरोपी युवकाने पीडित युवकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढले. सोशल मीडियातून झालेली दोघांची ओळख हळूहळू मैत्रीत आणि पुढे प्रेमात बदलली. प्रकरण पुढे लग्नापर्यंत गेले. विशेष म्हणजे आरोपी तरुणाने लग्नासाठी स्वत:ला मंगळ दोष असल्याचे सांगून पीडित तरुणाकडून चार वेळा 10 हजार 400 किलोमीटर अंतराची नर्मदा नदी यात्राही केली.
लग्नाचे अमिष दाखवत आणि मुलीचा आवाज काढत आरोपी तरुणाने पीडित तरुणाला त्याच्या (पीडित) पैशांनी देशभरातील अनेक ठिकाणी फिरवले. आरोपी तरुणावर (संजना) पीडित तरुणाने लाखो रुपये खर्च केले. मात्र, अखेरीस फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच पीडित तरुणाने पोलीसांत तक्रार दिली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. सध्या आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.