धक्कादायक! खोटी लग्न लावून तब्बल 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री; वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त

018 पासून आतापर्यंत तब्बल 629 पाकिस्तानी मुलींना नववधू बनवून त्यांची चीनमध्ये विक्री केली गेली आहे. या मुलींना पुढे क्लब, बार अशा ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते.

धक्कादायक! खोटी लग्न लावून तब्बल 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री; वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त
पाकिस्तानी मुलींची तस्करी-प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पाकिस्तानी (Pakistan) मुलींना फसवून त्यांचे खोटे लग्न लावून, चीनमध्ये (China) घेऊन जाऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 2018 पासून आतापर्यंत तब्बल 629 पाकिस्तानी मुलींना नववधू बनवून त्यांची चीनमध्ये विक्री केली गेली आहे. या मुलींना पुढे क्लब, बार अशा ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. चीनशी जवळच्या संबंधांमुळे, मुलींच्या तस्करीत गुंतलेले नेटवर्क उधळून लावण्यासाठी पाकिस्तान काहीही करू शकत नाही, मात्र त्यामुळे या 629 मुलींसह अनेकींचे आयुष्य धोक्यात आले आहे.

मुलींची खरेदी-विक्री करण्यासाठी फार मोठे नेटवर्क कार्यरत आहे. या नेटवर्कला शोधून त्यांचे कार्य हाणून पडण्यास पाकिस्तानी तपास यंत्रणा मदत करत आहेत. परंतु फेडरल सरकारच्या दबावामुळे ते प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. या नेटवर्कमध्ये जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कारवाई केल्यास, चीनशी मैत्रीपूर्ण संबंध दुखावले जाऊ शकतील अशी भीती पाकिस्तान सरकारला आहे. चीनने आपला मित्रदेश पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. परिणामी, मानवी तस्करीत अडकलेल्या 31 चिनी नागरिकांना, ऑक्टोबर महिन्यात फैसलाबाद येथील न्यायालयाने निर्दोष सोडले होते. (हेही वाचा: धक्कादायक! पाकिस्तानी तरुणींची चीनमध्ये तस्करी; लग्नाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात भरती)

कोर्टाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पोलिसांना माहिती देणाऱ्या अनेक स्त्रियांना नंतर धमकावण्यात आले. तसेच पैशाचा वापर करून त्यांचे तोंड बंद करण्यात आले. त्यामुळे वेळ आल्यावर त्यांनी खरी माहिती सांगण्यास नकार दिला. मुलींच्या तस्करीमध्ये सामील असलेले चिनी आणि पाकिस्तानी तस्कर, वधूसाठी चीनच्या नागरिकांकडून 65 हजार डॉलर्स (सुमारे 45 लाख रुपये) पर्यंत शुल्क आकारतात. पण मुलीच्या कुटूंबाला एक लाखापर्यंतच रक्कम दिली जाते. 2013 ते 2017 या काळात 91 हजार चिनी तरुणांना पाकिस्तानचा व्हिसा दिला गेला आहे. मागच्या दोन वर्षांत 750 ते 1000 पाकिस्तानी मुलींनी चिनी मुलांशी लग्न केली आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2019 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).