Photo Credit - Facebook

कोरोना महामारीमुळे देशातील नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गेल्या ९ महिन्यांपासून बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र, या काळात कंडोम (Condoms), रोलिंग पेपर (Rolling Paper), प्रेग्नंसी किट (Pregnancy Kits), गर्भनिरोधक गोळ्यांची (Emergency Contraceptive iPill) सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच डुन्झो अॅपने (Danjo App) एक अहवाल सादर केला आहे. ज्यात कोणत्या राज्यातील लोकांनी कोणत्या गोष्टींची सर्वाधिक खरेदी केली आहे? याबाबत माहिती देण्यात आली आहे. यात केवळ शरीरसंबंधांतील गोष्टी नसून खाद्यपदार्थांचाही समावेश आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कोरोना काळात रात्रीऐवजी दिवसा कंडोमची जास्त विक्री होत आहे. या रिपोर्टमध्ये डुन्झो अॅपच्या रिपोर्टचा दावा करण्यात आला आहे. या अॅपद्वारे रात्रीपेक्षा दिवसा तिप्पट कंडोमची विक्री होत आहे. तर जाणून घेऊया कोणत्या शहरात कोण-कोणत्या गोष्टींना सर्वाधिक मागणी आहे. हे देखील वाचा- धक्कादायक ! केनियाच्या मुलींबरोबर सेनेटरी उत्पादनांच्या बदल्यात ठेवले जातात जबरदस्तीचे लैंगिक संबंध

कंडोम-

कोरोना कळात संपूर्ण देशात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. तसेच या काळात रात्रीपेक्षा कंडोमची दिवसा अधिक विक्री झाली आहे. या यादीत हैदराबाद अव्वल स्थानी आहे. हैदराबादमध्ये रात्रीपेक्षा दिवसा 6 पटीने अधिक कंडोमची विक्री होत आहे. तर, चेन्नईमध्ये 5 पटीने, मुंबई आणि बंगळरूमध्ये 3 पटीने अधिक कंडोमची विक्री होत आहे.

गर्भनिरोधक गोळ्या-

पुणे, बंगळरू, ग्ररुग्राम हैदराबाद आणि दिल्लीत सर्वाधिक गर्भनिरोधक गोळ्यांची ऑर्डर्स आल्याची माहिती समोर आली आहे. तर, जयपूरमध्ये प्रेग्नंसी किटला सर्वाधिक मागणी असल्याची माहिती मिळत आहे.

खाद्यपदार्थ-

खाद्यपदार्थांच्या बाबतीत मुंबईत सर्वाधिक डाळ-खिचडी तर, बंगळरू येथे चिकन बिर्याणीची सर्वाधिक ऑर्डर्स आल्या आहेत. तर, चेन्नईतून ईडली आणि गुरुग्रामधून आलू टिक्की बर्गरची सर्वाधिक ऑर्डर केली गेली आहे.क विक्री झाली आहे. याशिवाय, पुणे आणि हैदराबाद शहरात दुधाला सर्वाधिक मागणी आहे. तर, दिल्लीत सॉफ्ट ड्रिंक्सची अधिक ऑर्डर्स आल्या आहेत.

दरम्यान, कंडोमचा वापर वाढल्याने महिलांमध्ये नसबंदी आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कमी झाला आहे. कौटुंबिक नियोजनामुळे हा बदल होत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.