ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजी विक्रेत्या (Sabzi Wala) नवनवीन क्लृप्त्या शोधून काढतात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात अन्य भाजीवाल्यांसमोर आपली भाजी किती चांगली आहे हे पटवून देण्यासाठी भाज्यांचे वैशिष्ट्य सांगणे, भाज्यांचे दर कमी-जास्त करणे आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या घोषवाक्यातून जोरदार मार्केटिंग करणे यांसारखे प्रकार करत असतात. मात्र झारखंडमध्ये एका भाजीविक्रेत्याने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. आपल्या डान्सने हा भाजीविक्रेता ग्राहकांना आकर्षित करत आहे आणि आपली भाजी विकत आहे. त्याचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये रितेश पांडे नावाचा भाजीवाला एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा नाच करता करता तो भाजी विकताना दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याचा पांडेजीचा हा नवा पर्याय सध्या सर्वांनाच भावला आहे.हेदेखील वाचा- मास्क वापरतास ना? कोरोनाचा खेळ संपवण्यासाठी 'अण्णा नाईक' च्या मिम्स सोबत महाराष्ट्र पोलिसांचे नागरिकांना आवाहन
ये धनबाद के रहने वाले रितेश पांडेय हैं। सब्जी बेचते हैं। लेकिन इनके सब्जी बेचने का तरीका इतना अनोखा है कि इन्होंने सोशल मीडिया पर बवाल मचा दिया है। आपके घर में झोले भर सब्जी हो, इसके बावजूद अगर रितेश के ठेले से गुजरे तो बिना सब्जी खरीदे नहीं लौटेंगे।#Dhanbad #RiteshPandey pic.twitter.com/u3y3WUBkKD
— Prerna Sharma (@Kumariprerana12) March 20, 2021
पांडेजी ही भाजी विकण्याची अनोखी पद्धत अनेकांना भावली. या व्हिडिओत एक किलोचे कांदे घेऊन जा, 2 किलोची भाजी घेऊन जा असे बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले तर तुम्हाला कळेल पांडे जी आपले काम खूप एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रेरणा शर्मा नावाच्या एका युजरने शेअर केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "हा धनबादचा राहणारा रितेश पांडे आहे. जो भाजी विकत आहे. मात्र याची भाजी विकण्याची पद्धत खूपच वेगळी आणि हटके आहे. तुमच्या घरी भरपूर प्रमाणात भाजी असली तरीही तुम्ही रितेशकडून त्याजी भाजी खरेदी केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने तो भाजी विकत आहे." असे म्हटले आहे.