आरपीएफ जवानाने वाचवले तरुणाचे प्राण (Photo Credits: Twitter)

मुंबई (Mumbai) च्या विरार रेल्वे स्थानकातून (Virar Railway Station) एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. यात एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकवर झोपलेला दिसत आहे. परंतु. रेल्वे सुरक्षा दलातील (Railway Security Force) म्हणजेच आरपीएफच्या (RPF) एका जवानाने सतर्कता दाखवत या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. आईच्या निधनाने दु:खी असलेल्या या 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो विरार रेल्वे स्टेशनवरुन ट्रॅकवर झोपला देखील. मात्र देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. त्याप्रमाणे आरपीएफचा जवान अगदी देवदूताप्रमाणे धावून आला आणि ट्रॅकवरुन त्याला खेचून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. या घटनेनंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी आरपीएफ जवानाच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

ही घटना बुधवार 24 फेब्रुवारी ची आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती चक्क विरारच्या रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर झोपला. स्टेशनवरील अनेक मंडळी यावेळी बघ्याची भूमिकेत होती. मात्र त्याचवेळी आरपीएफ जवान प्रवीण आणि त्याचे इतर साथीदार त्या ठिकाणी पोहचले आणि समोरुन ट्रेन येत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीला खेचून ट्रॅकबाहेर काढले. (पनवेल रेल्वे स्थानकात RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अपंग प्रवाशाचे प्राण, Watch Video)

पहा व्हिडिओ:

आरपीएफ जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. चालत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेल्याने, ट्रॅकवर पडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आल्यावर आरपीएफचे जवाना नेहमीच मदतीला धावून आले आहेत.