वधूची एन्ट्री (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल लग्नसोहळ्यांमध्ये चालीरीती कमी आणि दिखावाच जास्त पहायला मिळतो. लग्नात होणारा खर्च आणि केलेला ताम-झाम यावरून लग्न किती चांगले झाले हे लोक ठरवतात. नवीन ट्रेंडमध्ये वधूच्या एन्ट्रीकडे विशेष लक्ष दिले जाते. नवरी कधी पालखीमधूल तर कधी भावांच्या खांद्यावरून मंडपात प्रवेश करते. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू थेट आकाशातून फुग्यांच्या झोक्यावर बसून खाली उतरत लग्नस्थळी पोहोचत असलेली दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरासह इतर पाहुणे लग्नाच्या ठिकाणी आधीच पोहचले आहेत व ते वधूच्या येण्याची वाट पाहत आहेत. त्याचवेळी वधू पांढर्‍या पोशाखात आकाशातून पांढर्‍या फुग्यांवर स्वार होत लग्नस्थळी येताना दिसते. सहसा ख्रिश्चन वधू आपल्या वडिलांसोबत लग्नाच्या ठिकाणी येते. तिच्यासोबत तिचे नातेवाईक, मित्र आणि जवळचे लोक उपस्थित असतात. मात्र ही इटालियन नववधू 250 हेलियम फुग्याच्या (Helium Balloons) मदतीने आकाशातून मंडपात आली आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो 40 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावेळी वधूने Dolce & Gabbana वेडिंग गाऊन घातला आहे., ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @sposiamovi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जे एका वेडिंग प्लॅनरचे खाते आहे. याच वेडिंग प्लॅनरचे हे भव्य लग्न आयोजित केले आहे. व्हिडिओला ‘हवेवर तरंगणे’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान. हेलियम वायू हा हवेपेक्षा हलका आणि ज्वलनशील असतो, म्हणून तो फुग्यांमध्ये भरला जातो.