![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/07/Rat-Attack--380x214.png)
लंडन येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्यावर शंभरहून अधिक उंदरांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. महिलेने असे म्हटले आहे की, गार्डनमध्ये फेरफटका मारत असताना तिच्यावर उंदरांनी हल्ला केला आहे. त्यावेळी उंदरांनी तिचे हात आणि पाय सुद्धा कुरतडले. त्यामुळे महिलेने नागरिकांना रात्रीच्या वेळेस गार्डनमध्ये जाऊ नका असे म्हटले आहे. 'द सन' मध्ये छापण्यात आलेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये राहणारी 43 वर्षीय सुसान ट्रेफ्टब 19 जुलै रोजी रात्री 9 वाजल्याच्या सुमारास नॉर्थफिल्ड्स, ईलिंग स्थित असलेल्या ब्लोंडिन पार्कात फिरत होती. तेव्हा तिची नजर गवतावर फिरणाऱ्या उंदरांवर गेली. तेव्हा तेथे ऐवढ्या मोठ्या प्रमाणत उंदीर पाहून ती घाबरली. त्या पार्कातून ती निघेल ऐवढ्यातच उंदरांनी तिच्यावर हल्ला.
रिपोट्सनुसार, सुसान हिने असे म्हटले ऐवढे उंदीर एकत्रित कधीच पाहिले नाहीत. मला असे वाटले की मी आजारी पडणार आहे. उंदीर माझ्या पायांच्या येथे रेंगाळत होते आणि मी त्यांना लाथा मारुन दूर करत होती. रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने पाहणे मुश्लिक होते की, उंदीर नेमके कुठून येत होते. उंदरांनी माझे पाय कुरतडले आणि माझ्या शरीरावर चढण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला.(Viral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत)
ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मदत कोणाकडे मागणार हेच काही कळत नव्हते. मी कधीच कोणाला अशा पद्धतीच्या हल्ल्याबल्ल बोलताना ऐकले नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी रात्रीच्या वेळेस पार्कसारख्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. तर ईलिंग काउंसिलचे प्रवक्ते यांनी म्हटले की, पार्कात वगैरे घाण असल्याने शिल्लक राहिलेले अन्न खाण्यासाठी जनावरांना देण्यासाठी टाकले जाते. त्यामुळेच उंदर पार्कात येतात. यासाठीच लोकांनी खाण्याच्या गोष्टी अशा बाहेर फेकू नयेत.