भारताचे मोठे उद्योगपती रतन टाटा यांनी सोशल मीडियावर व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शेअर केली त्यांची लव्हस्टोरी; वाचा सविस्तर
Ratan Tata (Photo Credit: Facebook)

भारताचे मोठे उद्यागपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांनी व्हॅलेंटाइनडे च्या निमित्ताने सोशल मीडियावर आपली लवस्टोरी शेअर केली आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लॉस एन्जिलिसमध्ये काम करत असताना त्यांचे लग्न ठरले होते, याची माहिती दिली आहे. याशिवाय रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगाची माहिती फेसबुकवर शेअर केली आहे. यात त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट, बहिणीच्या सहवासात घालवलेले दिवस, त्यांच्यावर घडलेले संस्कार, कॉर्निल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण आणि प्रेम प्रकरणाचाही समावेश आहे. हे सर्व 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' (Facebook Page Humans of Bombay)या फेसबुक पेजशी शेअर केले आहे.

व्हॅलेंटाइन डेला केवळ काही तासच शिल्लक राहिले असून प्रत्येकजण यादिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत प्रेम व्यक्त करत असतात. यातच रतन टाटा यांनीही आपली प्रेम कथा लोकांसमोर मांडली आहे. त्यांनी ह्यूमन्स ऑफ बॉम्बे पेजवर प्रेम करत ते म्हणाले आहे की, आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केल्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये 2 वर्ष नोकरी केली. त्या ठिकाणी ते काम करत असताना त्यांचे एका मुलीवर प्रेम जडले. ते त्याच मुलीशी लग्न करणार होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या मोठ्या बहिणीची तब्येत ठिक नव्हती. त्यामुळे त्यांना भारतात यावे लागले होते. हे देखील वाचा- #ThrowbackThursday: रतन टाटा यांनी शेअर केला तरुणपणीचा लूक, भल्या भल्या अभिनेत्यांना ही मागे टाकेल; एकदा पहाच

रतन टाटा यांची फेसबूक पोस्ट-

लहाणपणाची गोष्ट सांगत रतन टाटा म्हणाले की, त्यांचे बालपण हासत-खेळत पार पडले. परंतु, त्यांचे आईवडील वेगवेगळे झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान आपल्या मोठ्या बहिणीचा विषय काढून तिची आठवण काढली. दुसरे महायुद्धानंतर त्यांची मोठी बहीण त्यांना लंडनला घेऊन गेली होती. तसेच यासंदर्भात कोणाशीही काहीही बोलू नका, असा सल्ला देत असे. तसेच तिनेच त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले आहेत, असेही ते म्हणाले आहेत.