Snake-Rats Playing Together on Lord Ganesh Idol Viral Video:  गणपती बाप्पाच्या मूर्तीवर साप आणि उंदीर यांचा एकत्र वावर; पहा या दुर्मिळ नजाराच्या व्हायरल व्हिडीओ!
Ganpati | Photo Credits: Twitter

गणपती बाप्पाचं वर्णन हे सुखकर्ता, दु:खहर्ता असं केलं जातं. अनेक गणेशभक्त मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून गणांचा अधिपती असणार्‍या गणपतीची मनोभावे पूजा करतात. पण मनुष्य गणांसोबातच प्राणी मात्रांनाही अभय देणार्‍या गणपती बाप्पाचं एक रूप सध्या सोशल मीडीयामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे. ट्वीटरवर व्हायरल एका व्हिडीओमध्ये गणेशमूर्तीवरच उंदीर मामा आणि नागराज यांचा एकत्र वावर अनुभवायला मिळत आहे. एरवी उंदीर हे सापाचं भक्ष्य असतात. शेतामध्ये धनधान्यांची नासाडी उंदरांपासून होऊन नये म्हणून सापांचा वावर असतो. पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गणेश मूर्तीवरच दुडूदुडू धावणारे उंदीर आणि त्यांच्यासमोर नागोबा डोलताना दिसत आहे.

दरम्यान मूषक म्हणजेच उंदिर हे गणपतीचं वाहन आहे असे हिंदू पुराणकथांमधून सांगण्यात आले आहे. अनेकजण घरात उंदरांचा धुमाकूळ वाढला तर बाप्पाची पूजा करतात. अशी धारणा आहे की त्यांच्या करवी घरातील उंदरांचा उपद्रव कमी केला जाऊ शकतो. निसर्गामधील अन्न साखळी पाहिली तर साप हे उंदरांवर अवलंबून असतात पण या व्हिडिओमध्ये भक्ष्य आणि भक्षक एकत्र नांदताना दिसत आहेत. इतकं दुर्मिळ चित्र क्वचितच कधी कुणाला बघायला मिळालं असेल. (हे देखील वाचा: उंदराच्या पॅडला नाग चिकटला, खोबऱ्याचे तेल वापरून कसा काढला? पाहा व्हिडिओ ).

गणेश मूर्ती वर डोलणारे नागोबा आणि उंदीर मामा

बाप्पाची लीला  

जय श्री गणेश। न सांप ने चूहे खाए न चूहो ने लड्डू। हम कहे भगवान कहा है। pic.twitter.com/AF7tkuOHbH

आज अनंत चतुर्दशीचा सण आहे. गणेशभक्तांसाठी 10 दिवसांचा असणारा गणेशोत्सव आज संपणार आहे. सार्वजनिक आणि घरगुती 10 दिवसांच्या बाप्पांच्या मूर्तीला यंदा साधेपणानेच निरोप देण्यास सुरूवात झाली आहे. गणेश चतुर्थी म्हणजे 22 ऑगस्टला यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली तर आज अनंत चतुर्दशी दिवशी त्याची सांगता होईल.