राजस्थान: तरुणीला साप चावल्याने डॉक्टरांनी केले मृत घोषित पण स्मशानभुमीत अंत्यसंस्कारवेळी उठून बसली
Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

राजस्थान (Rajasthan) येथे एका 21 वर्षीय तरुणीला साप चावल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारासाठी तरुणीला नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी दुख व्यक्त करण्यात आले. त्याचसोबत अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा सुरु करण्यात आली. मात्र त्यानंतर असा प्रकार घडला की चक्क तरुणी स्मशानभूमीच्या ठिकाणी उठून बसली असल्याचे दिसून आले. यामुळे स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

श्वेता हिला साप चावल्याने रुग्णालयात घेऊन गेल्याने तिला मृत घोषित केले. त्यामुळे परिवारावर शोककळा पसरली होती आणि अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा केली. मात्र स्मशानभुमीत घेऊन गेल्यावर तिचा श्वास पुन्हा सुरु झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले. त्यावेळी तरुणीने उठण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने श्वेता हिला पुन्हा एकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आता श्वेता हिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.श्वेता हिचा जीव वाचल्याने सर्वांना आनंद झाला असून एक प्रकारचा चमत्कारच असल्याचे म्हटले जात आहे. तसेच श्वेता हिच्या पुन्हा जीवंतपणाची गोष्ट संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली आहे.(#Video: कल्याण मध्ये भर रस्त्यात आढळला दोन तोंडाचा घोणस साप)

यापूर्वीसुद्धा बुधनगर येथील एका सेवानिवृत्त सैनिकाचा मुलगा हरवल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुलाचा शोध सुरु करण्यात आल्यानंतर गावातील एका नदीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. सापडलेला मुलगा सेवानिवृत्त सैनिकाचा मुलगा असल्याचे समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचा खरा मुलगा घरी आला असल्याचा प्रकार समोर आला होता.