खोट्या सापासह प्रँन्क (Photo Credits: Instagram)

Prank With a Fake Snake: नवरा बायको यांच्या मध्ये मजामस्ती नेहमीच सुरु असते. मात्र काही वेळी आपल्या पार्टनर सोबत केलेली मजा ही त्यांना घाबरवून सोडणारी ठरते. याच दरम्यान, सोशल मीडियात एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून बायको आपल्या पतीला घाबरवण्यासाठी एक प्रँन्क करते. हा प्रँन्क नवऱ्याला ऐवढा घाबरवून सोडतो की तो चक्क तलवार घेऊन खोट्या सापाला मारण्यासाठी पुढे येतो.(तुर्कीमध्ये सापडला सोन्याचा खजिना; खजिन्यात मिळालेल्या सोन्याची किंमत आहे बऱ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा ही जास्त)

Lowsena नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. खरंतर महिला आपल्या रुमच्या जमिनीवर एक बेल्ट ठेवते. त्यानंतर ती नवऱ्याला हाक मारत जमिनीवर काही तरी आहे असे म्हणून ओरडते. नक्की काय झाले हे पाहण्यासाठी नवरा जेव्हा रुममध्ये एन्ट्री करतो त्यावेळी तो बेल्टला साप समजून घाबरतो. सापाला मारण्यासाठी तो पुढे येतो. पण घाबरुन पुन्हा बाहेर निघून जातो.(Viral Video: जंगली घोड्यांनी चोरले Baby Stroller; फ्लोरिडामधील विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by lowsena (@lowsena)

तर नवरा बायकोला विचारतो की ते काय होते? त्यावेळी बायको जोरजोरात हसत तो एक बेल्ट असल्याचे त्याला सांगतले. हा व्हिडिओ शेअर करत लोसेनाने कॅप्शन लिहिले की, माझ्या नवऱ्यासोबत आणखी एक गंमत केली असून तो सापांना खूप घाबरतो. त्याचा हा बेल्ट असून तो एका तलवारीसोबत घरात आला. संपूर्ण व्हिडिओ युजर्सनी पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.