तुर्कीमध्ये सापडला सोन्याचा खजिना; खजिन्यात मिळालेल्या सोन्याची किंमत आहे बऱ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा ही जास्त
Photo Credit : Pixabay

तुर्कीमध्ये सोन्याचा खजिना सापडला आहे. त्याचे एकूण वजन 3.5 दशलक्ष औंस म्हणजे सुमारे 99 टन मोजले जात आहे.जर किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हे सोने 6 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 44 हजार कोटी रुपये एवढे आहे.मंगळवारी तुर्कीची वृत्तसंस्था अनाडोलू यांनी ही माहिती दिली.सोन्याच्या खजिन्याची बातमी आपण नेहमीच एकली असेल पण या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण असे अनेक देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्थाही या खजिन्यामध्ये मिळालेल्या पैशापेश कमी आहे. (फ्लोरिडातील रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये दिसू शकतो अजगर; जर चाचणीदरम्यान ते खाणे सुरक्षित आढळले तर घेतला जाणार निर्णय)

बर्‍याच देशांची जीडीपी या खजान्यापेक्षा ही कमी

world meter कडून मिळालेल्या माहितीनुसार मालदीव (Maldives - 87.8787 अब्ज डॉलर) लाइबेरिया (Liberia- 3.29 अरब डॉलर), भूतान (Bhutan- 2.53 अरब डॉलर), बुरुंडी (Burundi-3.17 अरब डॉलर) आणि लेसोथो (Lesotho- 2.58 अरब डॉलर) या खेरीज मॉरिटानिया, मॉन्टेनेग्रो, बार्बाडोस, गयाना आणि इतर काही छोटे देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था यापेक्षा लहान आहे. या सारख्या देशांची अर्थव्यवस्था तुर्कीमध्ये सापडलेल्या या खजिन्यापेक्षा लहान आहे.

हा खजिना कुठे सापडला

हा खजिना पश्चिम मध्य भागीतील Sogut इथे मिळाला आहे.ज्याची माहीती Fahrettin Poyraz ने दिली आहे.Poyraz न्यूज एजेंसी ने Anadolu ला .सांगितले कि सोन्याच्या त्या खजिन्या की कींमत जवळजवळ 6 अरब डॉलर असू शकते.ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री फातिह डोन्मेझ यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की तुर्कीने गेल्या वर्षी 38 टन सोन्याचे उत्पादन करून मोठा विक्रम मोडला होता. ते म्हणाले होते की, येत्या वर्षात त्यांचे वार्षिक उत्पादन वार्षिक 100 टन उत्पादन होण्याचे लक्ष्य आहे.

हे सर्व सोने दोन वर्षांत काढले जाईल

हे सोने पुढील दोन वर्षांत खोदले जाईल आणि हे सोने तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला वाढ मिळवून देण्यास मदत करेल असे पोयराझ म्हणाले. ते म्हणाला की त्याच्या गुब्रेटस खत उत्पादकाने कोर्टाच्या निर्णयानंतर 2019 मध्ये दुसर्‍या कंपनीकडून ही जागा ताब्यात घेतली. सोन्याच्या बातमीनंतर, गुब्रेटसच्या शेअर्समध्येही सुमारे 10% वाढ झाली.