Kangana Ranaut (Photo Credits: Twitter)

गेल्या काही दिवासांपासून सातत्याने वादग्रस्त विधानं केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही आज मुंबईत (Mumbai) दाखल झाली. कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात होती. तसंच केंद्र सरकारकडून तिला Y+ सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान ती मुंबईत दाखल झाल्यानंतर तिच्या घर आणि ऑफिसभोवती पत्रकारांची एकच झुंबड उडाली होती. यावेळेस घर आणि ऑफिसभोवती असलेल्या सामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी एकच गर्दी केली. कंगनाच्या ऑफिसबाहेर फिरणाऱ्या एका पोस्टमनला पत्रकारांनी घेरले आणि त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून निषेध केला जात आहे. पत्रकारांनी घेरल्यानंतर या घटनेशी माझा काही संबंध नाही, असे पोस्टमन पत्रकारांना विनवून सांगत आहे. मात्र एक पत्रकार त्या पोस्टमनकडे सरकारी कागदपत्रं मागत आहे. तर दुसरा त्याला विचारत आहे की, तुम्ही कंगनाची संपत्ती का तोडली? यावर उत्तर देताना पोस्टमन म्हणत आहे की, "मी एक साधा पोस्टमन आहे. मी काहीही केलेले नाही." हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांनी मीडियाबद्दल राग व्यक्त केला जात आहे. तर काही जण या घटनेची खिल्लीही उडवत आहेत. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत कंगना रनौत हिने ट्विटरवर पोस्ट केला व्हिडिओ)

पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

 

कंगन रनौत हिचा बंगला आणि ऑफिसमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तोडक कारवाई करण्यात आली.  यानंतर कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उद्देशून एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असून "आज माझे घर तुटले उद्या तुझी घमंड तुटेल," असे म्हटले आहे.