
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे वाहक, जागतिक मंचावर भारताचा यशस्वी चेहरा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे, आज 17 सप्टेंबर 2022 रोजी वयाची 72 वर्षे पूर्ण करून 73 व्या वर्षात प्रवेश करत आहेत. कुशल वक्ता, करिष्माई नेतृत्व, दूरदृष्टी, उत्तम नियोजक, तंत्रज्ञानाशी जोडलेला नेता अशी अनेक बिरुदे मिरवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. नरेंद्र दामोदरदास मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत.
लहानपणी त्यांचे वडील स्वतःचा चहाचा व्यवसाय चालवायचे. वयाच्या 8 व्या वर्षी नरेंद मोदींनी आरएसएसमध्ये प्रवेश केला. पदवीनंतर त्यांनी घर सोडले आणि दोन वर्षे भारत भ्रमंती केली. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. 1970 मध्ये ते गुजरातमध्ये परतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ नेते बनले. भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2021 मध्ये गुजरातच्या भूकंपात तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची प्रकृती बिघडल्याने, नरेंद्र मोदी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. राज्यात ते सलग 4 वेळा मुख्यमंत्री होते. पुढे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी गुजरातमधून बाहेर पडले आणि केंद्राच्या राजकारणात उतरले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.
आज पंतप्रधान नरेंद मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास Messages, Wishes, Images, Greetings च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार.





दरम्यान, 2014 पर्यंत देशभरातील 7 राज्यात भाजपचे सरकार होते. पण, त्यानंतर पीएम मोदी हे पक्षाचा सर्वात प्रमुख चेहरा बनले. 2014 ते 2018 या काळात भाजपने देशातील 28 पैकी 21 राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. ज्याने एकाच वेळी 16 राज्यांमध्ये सरकार चालवण्याचा काँग्रेसचा विक्रमही मोडला. सध्या देशातील 12 राज्यांमध्ये भाजप स्वबळावर राज्य करत आहे, तर चार राज्यांमध्ये ते आघाडीच्या पक्षांसह युतीमध्ये सरकार चालवत आहे. (हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास 56 इंचाची थाळी, थाळी संपवणाऱ्यास आठ लाखांच्या बक्षीसासह केदारनाथची यात्रा)
आता पंतप्रधांच्या वाढदिवसाच्या या विशेष प्रसंगी विविध राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांतर्गत देशभरात साजरा करण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे.