Fish In Oven (Photo Credit: YouTube)

जेवणासोबत मस्ती नको असं अनेकदा वडीलधारी मंडळी मुलांना दटावताना तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल पण सध्या सोशल मीडीयामध्ये एक वायरल व्हिडिओ तुफान चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडीयामध्ये सध्या वायरल होत असलेल्या एका व्हिडीओ मध्ये चक्क मायक्रोव्हेव ओवन मध्ये माशाचा एक तुकडा वरखाली उडताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांना थक्क करणारा आहे त्यामुळेच अनेक नेटकर्‍यांनी मागील काही दिवसांत त्याला प्रचंड शेअर केले आहे. ( नक्की वाचा: Crab Cutting Vegetables: 'हा' व्यक्ती चक्क खेकड्याकडून कापून घेतो भाजी; पहा Viral Video).

दरम्यान सोशल मीडीयात वायरल होत असलेली व्हिडीओ 5 वर्ष जुनी आहे. मात्र मागील काही दिवसांत ती पुन्हा झपाट्याने शेअर केली जात आहे. या व्हिडीओ मध्ये ओव्हन एका सिल्व्हर फॉईल ठेवलेल्या ट्रे मध्ये माशाचा तुकडा आहे. तो ओव्हन मध्ये शिजवताना काही काळ वर खाली उडताना दिसत आहे. एरवी मासा शिजताना तो अशाप्रकारे उडत नसल्याने अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

वायरल व्हिडिओ

माशाची वायरल होत असलेली ही क्लिप अवघ्या 35 सेकंदाची आहे. यामध्ये मासा अशाप्रकारे वर-खाली उडत आहे की त्याला पाहून काही नेटकर्‍यांनी हा सिन एखाद्या भयपटाला देखील हरवेल असा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. युट्युब वर याला 3.2 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.