सोशल मिडीयावर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नावाने काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सांगितले जात आहे की- ‘140 नंबर वरून कॉल आला तर तो उचलू नका, नाहीतर तुमच्या खात्यातील पैसे कट होतील.’ अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओजमध्ये पोलीस विविध ठिकाणी 140 या नंबरबद्दल सांगत असलेले दिसून येत आहेत. 140 या नंबरचा फोन उचलला तर बँक खात्यातील पैसे गमावून बसाल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. महाराष्ट्र सायबरनेही या नंबरवरून फोन आल्यास आपल्या बँक खात्याचा तपशील शेअर करू नये असे सांगितले आहे. यासह 140 या नंबर बाबत अजून एक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
पहा व्हिडिओ -
@MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @AUThackeray @ndtv @MumbaiMirror @zeemarathi this and one more video is been widely circulated on WhatsApp saying don't pick calls from number starting with 140 what sort of sorcery is this? How is it even possible?please confirm pic.twitter.com/pwolST5z4p
— Royson (@royson) July 10, 2020
I got this video from other social media channel. Wherein a police office can be seen telling not to receive any calls from number starting with 140. Pls validate and confirm its authenticity pic.twitter.com/ESb02gFR52
— pranav (@sanepranav) July 10, 2020
तर, सध्या विवीध ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) मुळे दिवसागणिक अनेक फिल्म्स, सिरीज प्रदर्शित होत आहेत. अशा प्लॅटफॉर्मची संख्या वाढल्याने वाहिन्यांप्रमाणेच यांच्यामध्येही स्पर्धा, चढाओढ सुरु झाली. परिणामी प्रत्येक प्लॅटफॉर्म आपल्या सिरीज अथवा चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अनेक हटके मार्ग वापरत आहेत. मात्र कधी कधी या प्रमोशनल ट्रिक्स लोकांच्या जीवावर उठू शकतात. असेच घडले आहे सोनी लिव्ह (Sony Liv) चा नवा शो अनदेखी (Undekhi) बद्दल. असे दिसत आहे की, नेटवर्कने ‘अनदेखी’ची जाहिरात करण्यासाठी टेलिकॉलर्स नियुक्त केले आहेत, ज्याद्वारे लोकांना फोन केले जातात. (हेही वाचा: कॉमेडियन अग्रीमा जोशुआ कडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कारवाईसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गृहमंत्र्यांना पत्र)
तर तुम्ही म्हणाल, साधे फोन तर करतात त्यात काय एवढे? मात्र हे तितके सोपे नाही. समोरून फोन आल्यावर व्यक्ती म्हणते, ‘हेलो मी रिशी बोलतोय’, आपण काही म्हणायच्या आधीच समोरची व्यक्ती बोलायला लागते- ‘इथे एक खून झाला आहे. हा खून मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे आणि तो रिंकू मला देखील मारायचा प्रयत्न करेल.. ओह शीट.. अनदेखी स्ट्रीमिंग नाऊ ऑन सोनी लिव्ह’
तर असे हे कॉल्स आहेत. साहजिकच तुम्हाला जर असले कॉल आले, तर पहिली एक दोन वाक्य ऐकूनच तुम्ही घाबरून जाल किंवा तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करायचा विचार कराल. अशीच गोष्ट अनेकांच्या बाबतीत घडली आहे व सोशल मिडीयावर याबाबत पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. हे सर्व कॉल मुख्यत्वे 140 या अंकांनी सुरु होणाऱ्या नंबर्सवरून येत आहेत. अनेक युजर्सनी आपल्याला आलेले कॉल आणि ते ऐकून आपली झालेली स्थिती सोशल मिडियावर कथन केली आहे. प्रसिद्ध Artistic Director स्म्रिती किरण यांनीही त्यांना आलेल्या कॉलबद्दल सांगितले आहे.
Shame on you @SonyLIV I just got to know that this call is a promotional gimmick for your new show. I was on the floor breathless with panic when I got it. Are you out of your mind doing this??? @MumbaiPolice you must take action. This is appalling and unethical. https://t.co/4Vp1YAzYjW
— smriti kiran (@smritikiran) July 10, 2020
What a ridiculous #promotional call trick by #Undekhi #SonyLIV Do U even realise what this can cause to a person if they miss out the last few words in panic. Get a better way to promote your series #webseries #advertisement #ScamAlert #murdercall #unethical #worldpremiereseries pic.twitter.com/8CzUhTkVti
— Suvrata Bhati (@BhatiSuvrata) July 10, 2020
एक युजर लिहितो, ‘हा कॉल ऐकून सुरुवातीला तर माझे काळजाचे ठोके थांबले. माझ्याजागी एखादी वयस्कर व्यक्ती असती तर? अशा व्यक्तीला फार मोठा धक्का बसला असता. सोनी लिव्ह तुमची ही प्रमोशनची पद्धत अतिशय खालच्या पातळीवरील आहे. तर अशा प्रकारे या 140 पासून सुरु होणाऱ्या कॉलमुळे अनेकजण डिस्टर्ब झाले आहेत.
What creepy shit promotion stint is this.... Horrible! @MIB_India @TRAI
How are Such promotional calls even allowed?
I almost skipped a heart beat, imagine elders or someone with weak heart conditions recieving it! Calling#+91 140 897 0061 #cheapshot pic.twitter.com/EOZDS35xsf
— R K (@RRosleen) July 10, 2020
त्यानंतर आता सोनी लिव्हकडून माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. ते म्हणतात, ‘आमच्या 'अनदेखी' या शोबाबत आपल्याला जर का कॉल आला असेल आणि त्यामुळे जर का तुम्ही डिस्टर्ब झाला असाल, तर त्याबाबत आम्ही दिलगीर आहोत. हे एक चुकून झालेली टेस्टिंगची प्रक्रिया होती आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण करणे किंवा लोकांना घाबरवणे नव्हता. याद्वारे झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’
If you have received a call for our show Undekhi & it has disturbed you we would like to sincerely apologise to you. This was a test activity which has gone out accidentally & our intention was not to cause any kind of discomfort or panic. We sincerely regret any inconvenience.
— SonyLIV (@SonyLIV) July 10, 2020
खऱ्या घटनेवरून प्रेरित झालेला हा 'अनदेखी' शो 10 जुलै 2020 रोजी हे रिलीज झाला आहे. दरम्यान, TRAI च्या नियमानुसार टेलिमार्केटर्सनी नागरिकांना कॉल करताना 140 हा नंबर वापरणे गरजेचे आहे, जेणेकरून हा फोन टेलिमार्केटर्स कडून आल्याची माहिती युजर्सना होईल.