Chhatrapati Shivaji Maharaj, Comedian Agrima Joshua (PC - Twitter)

कॉमेडियन अग्रिमा जोशुआ (Comedian Agrima Joshua) हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे (Controversial Statement) नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अग्रिमाने एका स्टँडअप कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सध्या सोशल मीडियावर जोशुआचा एक वर्षापूर्वीचा एका स्टँडअप कार्यक्रमामधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवरायांबंद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नेटीझन्सनी जोशुआवर टिका केली आहे.

दरम्यान, अग्रिमाने एक वर्षापूर्वी एका स्टँडअप शोमध्ये मुंबईजवळ अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विषयावरुन विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अग्रिमाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. यावेळी अग्रिमा म्हणाली होती की, मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईट क्वोरा वर गेले. या साईटवर मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. या पुतळ्यामुळे महाराष्ट्राचं भलं होईल, असं या निबंधामध्ये एकाने म्हटलं होतं. तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकर असणार असून स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल. या लेझर लाईटच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल, असं म्हटलं होतं. तसेच एकाने तर तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं. मी याचं शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं, असं अग्रिमा विनोद करताना म्हणाली होती. (हेही वाचा - Lockdown in Thane: ठाणे राहणार आणखी 7 दिवस बंद; TMC परिसरात 12 जुलै 2020 ते 19 जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर)

शिवरायांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अग्रिमावर सोशल मीडियावर नेटीझन्सकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अग्रिमावर कारवाई करण्या येऊन तिला ताबोडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलं आहे. सरनाईक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. यात प्रताप सरनाईक यांनी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रिमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. आपण या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियनला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय ट्विटरवर अनेक युजर्संनी अग्रिमावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यातील अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अग्रिमाच्या अटकेची मागणी केली आहे.