लॉकडाऊन काळात Parle-G बिस्किटची 8 दशकांतील सर्वाधिक विक्री; नेटिझन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून निर्मात्यांवर कौतुकाचा वर्षाव
Parle G biscuit (Photo Credits: Twitter)

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना उतरती कळा लागली आहे. Lockdown अनेक कंपन्यांचे उत्पन्न शून्यावर आले असून काहींनी तर कंपन्या बंद सुद्धा केल्या आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र पार्ले-जी (Parle-G)कंपनीने एक वेगळाच विक्रम केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्ले-जी बिस्किट ची 8 दशकातील सर्वाधिक विक्री झाल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ या कंपनीला लॉकडाऊनचा फटका न बसता चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी साठी सर्वोत्कृष्ट बिझनेस झाला असून गेल्या 8 दशकांत असे पहिल्यांदाच घडले आहे.

इतकच काय तर पार्ले-जी च्या उत्तम विक्री मुळे या कंपनीचे शेअर्स ही 5% नी वाढले आहे. पार्ले-जी बिस्किट च्या जबरदस्त विक्रीमुळे कंपनीचे उत्पन्न 80 ते 90 टक्के वाढले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने 5 रुपयाच्या किंमतीत मिळणा-या पार्लेजी बिस्किटवर सर्वाधिक लक्ष दिले आहे. Coronavirus Lockdown: 'डी मार्ट'चे मालक राधाकृष्ण दमानी यांच्या संपत्तीत वाढ; भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत मिळवले दुसरे स्थान

नेटिजन्स हटके अंदाजात व्यक्त केल्या Parle-G बद्दलच्या भावना:

अभिनेता रणदीप हुडा चे ट्विट:

लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित मजूरांनी आपल्या गावचा रस्ता धरला. अनेक मजूर तर बेरोजगार झाले. अशा स्थितीत त्यांना 5 रुपयाला मिळणारे पार्ले बिस्किट परवडण्यासारखे होते. त्याचबरोबर अशा गरजूंना मदत करणा-या अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पार्लेजी बिस्किट खरेदी केली आणि ही 5 रुपयांचे पॅकेट गरजूंमध्ये वाटले. त्यामुळे याचाही आम्हाला भरपूर फायदा झाला असे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले आहे.