'आपण झोपलो की व्हायरस झोपतो, आपण मेलो की..', पाकिस्तानी नेते फाझल उर रहमान यांचा अजब शोध ऐकून नेटवर मीम्सचा पाऊस (See Funny Tweets)
Pakistan Politician Fazal Ur Rahman (Photo Credits: Video Screengrab/ @nailainayat/ Twitter)

कोरोना (Coronavirus) नामक महामारीने सगळ्या जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. जीव वाचवण्यासाठी लोकांना आपल्या घरातच कोंडून राहावे लागत आहे, या महामारीवर उपाय शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक, वैद्यकीय तज्ञ दिवस रात्र संशोधनात गुंतली आहेत, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे राष्ट्राचे संघटनेतील नेते फझल उर रहमान (Fazal Ur Rahman)  मात्र एक वेगळाच शोध घेऊन आले आहेत. रहमान यांनी अलीकडे एका मुलाखतीत आपण जेव्हा झोपतो त्या वेळेत शरीरातील व्हायरस सुद्धा झोपून जातो, आणि आपण मेलो की व्हायरस सुद्धा मरून जातो असा अजब गजब विचार बोलून दाखवला आहे. रहमान यांचे हे कोणालाही न सुचलेले विचार ऐकून तुम्ही कल्पना करू शकतात की सोशल मीडियावर मिमर्सने आतापर्यंत काय काय जोक्स केले असतील. यातीलच काही पोट धरून हसायला लावणाऱ्या रिएक्शन खाली दिलेल्या आहेत.

तत्पूर्वी रहमान यांनी नेमकं काय म्हण्टलंय हे दाखवणारा एक व्हिडीओ सुद्धा सध्या व्हायरल होत आहे. यात रहमान म्हणतात की "डॉक्टर लोकांना शक्य तितक्या वेळ झोपायला सांगतात का? कारण, “तुम्ही जितके जास्त झोपता, व्हायरस देखील झोपी जाईल आणि तो आपणास हानी पोहोचवू शकणार नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा झोपी जातो, मग आपण मरणार तेव्हा ते मरेल, पत्रकार आणि ट्विटर युजर नायला इनायत यांनी ही क्लिप ट्विटरवर शेअर केली.  COVID-19 Is Bacteria and Not Virus? कोरोनावर Aspirin ने उपचार होईल असे सांगणारा इटलीतील व्हिडीओ होतोय व्हायरल; काय आहे सत्य?

पहा हा व्हिडीओ

अपेक्षेप्रमाणे हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट करून रहमान यांच्या विचारांना उपरोधिक सलाम ठोकला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून केलेले मिम्स सुद्धा आपण आता पाहुयात

दरम्यान, हा व्हिडीओ कधी घेण्यात आला हे काही अद्याप समजलेले नाही. असे अनेक प्रकार सोशल मीडियावर रोजच व्हायरल होत असतात पण एका उच्च पदावरील नेत्याकडून हा दावा केला जाणे हे विशेष आहे.