ट्विटरच्या अभासी जगात दररोज काही ना काही ट्रेण्ड होत असते. जे युजर्स लक्ष्य नेहमी खेचून घेते. त्यात सर्वसामान्य युजर्स पासून ते अनेक मोठे सेलिब्रेटी आणि जगभरात चर्चेत असेलेल मोठी नामांकीत मंडळीही असते. आताही ट्विटरवर असाच एक ट्रेण्ड पाहायला मिळतो आहे. One Word Tweets Trend ट्विट या हॅशटॅगखाली हा ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden), मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि नासा (NASA), आयसीसी यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थाही सहभागी झाल्या आहेत.
One Word Tweets Trend या ट्रेण्डखली भरतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरयांनी ट्विट केलेला शब्द आहे 'क्रिकेट'. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट केलेला शब्द आहे 'डेमोक्रेसी'. ट्विटरवर हा ट्रेण्ड भलताच लोकप्रिय होऊ पाहतो आहे. आतापर्यंत अनेक नामवंत लोकांनीही या ट्रेण्डखाली ट्विट केले आहे. अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था NASA नेही 'universe' हाशब्द ट्विट केला आहे. ICC ने 'cricket' हा शब्द ट्विट करत या ट्रेण्डमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. (हेही वाचा, WhatsApp Feature Update: भारतातील युजर्ससाठी व्हॉट्सॲपचे नवे फीचर, आता चॅटींग करतानाही ऐकता येणार 'वॉयस मेसेज')
ट्विट
cricket
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 2, 2022
एकाच शब्दात ट्विट करण्याच्या या ट्रेण्डमध्ये केवळ समान्य लोकच नव्हे तर जगभरातील अनेक नेते, सेलिब्रेटी, खेळाडू आणि नामवंत लोकांचा समावेश आहे. लोक या ट्रेण्डखाली ट्विट तर करत आहेत पण काही लोक हा ट्रेण्ड नेमका कधी आणि का सुरु झाला याबातही जाणून घेऊ इच्छितात.
ट्विट
democracy
— President Biden (@POTUS) September 2, 2022
सांगितले जात आहे की, अमेरिकी ट्रेन सर्विसशी संबंधीत एक कंपनी एमट्रॅक ने सर्वात पहिल्यांदा पाठिमागील शुक्रवारी (2 सप्टेंबर) साडेबाराच्या दरम्यान एक ट्विट केले. यात केवळ एक शब्द 'ट्रेन' असे लिहून पोस्ट केले. सांगितले जात आहे की, या ट्विट नंतर ट्विटरवर हा ट्रेण्डस सेट झाला. आणि जो तो ट्विट करु लागला.
ट्विट
cricket
— ICC (@ICC) September 2, 2022
ट्विट
universe
— NASA (@NASA) September 1, 2022
अमेरिकेत सुरु झालेला हा ट्रेण्ड आता जगभरातही सुरु झाला आहे. अमेरिकेची आंतराळ संस्था नासाही या ट्रेण्डमध्ये सहभागी झाली आहे. यातूनच हा ट्रेण्ड किती प्रसिद्ध झाला आहे हे लक्षात येते. या ट्रेण्डमध्ये आयसीसी, गूगल मॅप्स आणि WWE यांसारखी संस्थाही जोडली गेली आहे.