लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून, मोदींची लाट कायम आहे हेच दिसून येतेय. गेल्या महिनाभर चाललेल्या निवडणुकींच्या धामधुमीचे आज ऐतिहासिक निकाल पाहण्यासाठी सर्वच जनता आसुसली होती. मात्र कामासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारवर्गाला हया लाइव्ह अपडेट्स आज थोडे अवघडच होते. त्यामुळे अशा लोकांना हे निकालांची बित्तंबातमी कळावी म्हणून एक व्यक्ती मुंबई मेट्रो स्टेशनवर(Mumbai Metro Station) चक्क आपल्या पाठीवर टीव्हीच लावून फिरताना दिसला. ह्यासंबंधी एका मेट्रो प्रवाशाने ट्विट केले.
This is what I came across today at a Metro station in Mumbai! #ElectionResults2019 pic.twitter.com/6mTTjukcec
— Jesal Sampat (@Jesal_Sampat) May 23, 2019
आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला दणक्यात सुरुवात झाली. हे ऐतिहासिक निकाल पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आज वीक डेज असल्यामुळे नोकरीला जाणा-या नोकरदार मुंबईकरांनी एका मुंबईकरानेच आपल्या पाठीला चक्क टीव्ही लावून अन्य मुंबईकरांना मतमोजणीचा लाइव्ह अपडेट्सचा पाहण्याचा अनुभव दिला. एका मेट्रो प्रवाशाने त्यासंबधी ट्विट केले होते.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशात 542 जागांवर मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात 48 जागांवर मतदान झाले आहे.