Ola वापरकर्त्याने बुक केली 730 रुपयांची राइड, प्रवास संपल्यावर मिळाले 5000 रुपयांचे बिल; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
Ola (PC-Facebook)

Ola Ride: बेंगळुरूमधील (Bangalore) एका घटनेने सर्वांनाचं धक्का बसला आहे. येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने ओला राइड (Ola Ride) संपल्यानंतर त्याचे बिल पाहिले तेव्हा त्याची अक्षरश: झोप उडाली. विद्यार्थ्याने आपली ओला राईड कमी किमतीत बुक केली होती. पण जेव्हा त्याला बिल आले तेव्हा विद्यार्थ्याला धक्काच बसला. खरे तर हे बिल इतके जास्त होते की ते पाहून विद्यार्थ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. महाविद्यालयीन विद्यार्थी अनुराग कुमार सिंगला कल्पना नव्हती की त्याने कमी किमतीत बुक केलेल्या कॅब राईडचे बिल किती असेल. हा विद्यार्थी कोलकाताहून केम्पेगौडा विमानतळावर उतरला होता. तेथून त्यानने कॅब बुक केली होती.

जेव्हा विद्यार्थ्याने कॅब बुक केली तेव्हा कॅबचे भाडे 730 रुपये होते, परंतु मठीकेरे भागात त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर चालकाने 5,000 रुपयांची मागणी केली. अनुरागच्या म्हणण्यानुसार, ओटीपी टाइप केल्यानंतर, कॅब ड्रायव्हरला अॅपवर माझे नाव सापडले. जेव्हा आम्ही गंतव्यस्थानावर पोहोचलो तेव्हा त्याने मला त्याच्या फोनची स्क्रीन दाखवली आणि त्याची रक्कम 5,194 रुपये होती. मला धक्काच बसला कारण मी संपूर्ण बेंगळुरूमध्ये फिरलो असतो, तरी मला 5,000 रुपये लागले नसते.(हेही वाचा - Ola Electric Scooter Scam: ओला स्कूटर घोटाळ्याचा पर्दाफाश; 20 जणांना अटक, देशभरात 1000 हून अधिक लोकांची फसवणूक)

अनुरागने सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या फोनवर भाडे तपासले तेव्हा त्याला कळले की, अॅपची अधिकृत राईड रद्द करण्यात आली आहे. म्हणजे तो अधिकृतपणे ट्रीपला नव्हता. अनुरागने या घटनेची तक्रार कॅब एग्रीगेटरच्या ग्राहक मंचावर केली. कन्नड येत नसल्यामुळे भाषेच्या अडचणींमुळे, सिंहने त्याच्या शेजाऱ्यांकडे मदत मागितली, ज्यांनी ड्रायव्हरशी संवाद साधला. अखेरीस, चालकाने सुरुवातीला उद्धृत केलेल्या भाड्याच्या दुप्पट, रु. 1,600 वर सेटलमेंट करण्याचे मान्य केले. (हेही वाचा - Ola S1X EV Scooter: ओलाने लॉन्च केली त्यांची सर्वात स्वस्त स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)

विद्यार्थ्याने अॅप आणि सोशल मीडियाद्वारे केलेल्या तक्रारींना ओलाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या घटनेवरून हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही कॅब बुक कराल तेव्हा सर्वात आधी त्याचा स्क्रीनशॉट घ्या, याच्या मदतीने तुम्ही कंपनीकडून तुमचे पैसे परत मागू शकता किंवा त्याबद्दल तक्रार करू शकता.