Ola Scooter | (Photo Credit - X)

Ola Service Complaints: शोरुमने स्कूटर दुरुस्तीचे लावलेले बिल पाहून एका ग्राहकास प्रचंड धक्का बसला. तो इतका संतापला की, रागाच्या भरात त्याने चक्क आपली स्कूटर घण घालून फोडली. स्कुटरची भर रस्त्यावर तोडफोड (Customer Smashes Ola Scooter) करत असलेल्या तरुणास उपस्थितांनीही हातभार लावला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Ola Electric Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक असंतुष्ट ग्राहक कंपनीच्या शोरूमच्या बाहेर त्याची ओला इलेक्ट्रिक स्कूटर (EV Market Challenges) फोडताना दिसत आहे. सांगितले जात आहे की, सदर स्कूटरच्या दुरुस्तीसाठी शोरुमने चक्क 90,000 रुपये इतके बील बनवले. ज्यामुळे तो अत्यंत निराश झाला आणि त्याने हे कृत्य केले.

भररस्त्यात तोडफोड

व्हायरल व्हिडिओमध्ये, पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेला हा माणूस शोरूमच्या समोर रस्त्यावर ठेवलेल्या ओला स्कूटरवर वारंवार हातोडा मारताना दिसतो. त्याचे कृत्य पाहून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बघे जमले. त्यांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाील कॅमेऱ्यात चित्रीत केला. सांगिचले जात आहे की, दुरुस्तीपोटी आलेल्या 90, 000 रुपये इतक्या प्रचंड बिलावरुन हा तरुण ग्राहक चिडला. त्याने रस्त्यातच स्कूटरची तोडफोड केली आणि तिला आगही लावली. ही घटना आज (24 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली. (हेही वाचा, Viral Video: नव्या कोऱ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बिघाड, शोरूमबाहेरच वाहनाचे अंत्यसंस्कार करत ग्राहकाचे अनोख्या पद्धतीने निषेध (Watch Video))

खराब ग्राहक सेवेबद्दल ओला इलेक्ट्रिकवर टीका

सोशल मीडियावर Nedrick News नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शोरूमने ₹90,000 चे बिल केले, ग्राहक नाराज झाला आणि त्याने शोरूमसमोर स्कूटर फोडली". या घटनेमुळे ऑनलाइन संताप व्यक्त करण्यात आला असून, वापरकर्त्यांनी कथित खराब ग्राहक सेवेबद्दल ओला इलेक्ट्रिकवर टीका केली आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, "जर तुम्ही तुमच्या ग्राहकांचे ऐकले नाही आणि त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर तुम्ही कोणत्याही व्यवसायात यशस्वी होणार नाही". आणखी एकजण म्हणाला, "कोणत्याही ग्राहकाला कधीही या संकटाचा सामना करावा लागू नये. दुचाकी खरेदी करणारे बहुतेक लोक एकतर मध्यमवर्गीय किंवा निम्न-मध्यमवर्गीय आहेत. हे सहसा त्यांचे पहिले वाहन असते आणि त्यांची जीवनरेखा देखील असते. अशा घटना पाहून वाईट वाटते.

ओलावर मोठ्या प्रमाणावर टीका

ताज्या अद्ययावत माहितीनुसार, या व्हिडिओला 930,000 हून अधिक दृश्ये आणि शेकडो टिप्पण्या मिळाल्या होत्या. मात्र, ओला इलेक्ट्रिकने अद्याप या घटनेबाबत निवेदन जारी केलेले नाही. ओला इलेक्ट्रिकला सार्वजनिक टीकेचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. सप्टेंबरमध्ये, कर्नाटकातील एका 26 वर्षीय व्यक्तीला त्याच्या नव्याने खरेदी केलेल्या ई-स्कूटरच्या सर्व्हिसिंगच्या समस्येचा सामना केल्यानंतर ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमला आग लावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मोहम्मद नदीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला वाहन खरेदी केल्यानंतर लगेचच त्यात वारंवार येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागला.

दरम्यान, अलिकडेच ओला इलेक्ट्रिकची परिचालन कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने पुनर्रचनेचा भाग म्हणून किमान 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना असल्याचे वृत्त समोर आले आहे. वाढत्या तक्रारी आणि सेवा केंद्रांवर प्रलंबित असल्याची नोंद होत असताना ही कपात करण्यात आली आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी या उपायाद्वारे "अनावश्यक कामे कमी करणे आणि नफा वाढवणे" हे उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, कंपनीने निव्वळ तोट्यात 43% वाढ नोंदवली, जी जुलै-सप्टेंबर कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत) 495 कोटी रुपये होती, जी आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 347 कोटी रुपये होती. मागील तिमाहीतील ₹1,644 कोटींवरून ₹1,214 कोटींवर महसूल 26.1 टक्क्यांनी घसरला.