नुडल्स (Noodles) हा बनविण्यासाठी अत्यंत सोपा आणि कमी वेळात होणार पादार्थ. त्यामुळे नूडल्स हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ असू शकतो. नुडल्स बनविण्याचे आणि खान्याचे विविध प्रकार सोशल मीडियावर आपण अनेकदा पाहतो. तसे व्हिडिओही व्हायरल होतात. पण, नूडल्स तयार करताना तुम्ही कधी पाहिले आहे काय? नूडल्स तयार करतानाचा एक व्हिडिओ (Noodles Factory Video) सोशल मीडायावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहाल तर कदाचित नूडल्स खाण्याची तुमची इच्छा मरु शकते. इतकेच नव्हे तर नूडल्स खाणे तुम्ही कायमस्वरुपी बंदही करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ काहीसा जपूनच पाहा असे आम्ही आमच्या वाचकांना सूचवू इच्छितो.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपणास एक कारखाना पाहायला मिळतो. जिथे नूडल्सची भट्टी उभारली आहे. ही भट्टी अत्यंत अस्वच्छ आणि अरुंद जागेत आहे. इथले कामगारही अत्यंत अस्वच्छ आहेत. त्यांनी नूडल्स बनविण्याच्या पिठात हात घालण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत. इतकेच नव्हे तर ते उगड्या हाताने आणि उगड्याच शरीराने नग्न पायांसह पिठात उतरत आहेत. नूडल्स बनवत आहेत आणि नूडल्सची वाहतूकही करत आहेत. (हेही वाचा, Noodles Knitting: नूडल्स विणकाम, कला तर पाहा, व्हाल अवाक (Video))
घाणेरड्या हातांनी पिठ मळणे, हाताळण्यापासून ते थेट भट्टीत टाकून त्याच घामाघूम शरीर आणि हातांनी पॅकींग करणयापर्यंतचा सर्व विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक दृश्य तर असे दिसते ज्यात नूडल्स चक्क घाणेरड्या फरशीवर फेकले जातात. त्यावर बारदाणाची पोतीही पाण्यात भिजवून झाकली जातात.
चिराग बडजात्या नावाच्या युजरने ट्विटरवर ही क्लिप शेअर केली असून त्यात असे कॅप्शन लिहिले आहे की, “शेवटच्या वेळी तुम्ही रोडसाइड चायनीज हक्का नूडल्स विथ शेझवान सॉस कधी घेतले होते का?” कॅप्शन वाचून व्हिडिओ पाहिला किंवा व्हिडिओ पाहून जरी तुम्ही कॅप्शन वाचली तरी तुमच्या मनात एकच भावना निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. ती म्हणजे नूडल्सच न खाण्याची.
व्हिडिओ
When was the last time you had road side chinese hakka noodles with schezwan sauce? pic.twitter.com/wGYFfXO3L7
— Chirag Barjatya (@chiragbarjatyaa) January 18, 2023
व्हिडिओ शेअर केल्यापासून हे वृत्त लिहीपर्यंत त्याला 436,000 व्ह्यूज आणि 2 हजारहून अधिक लाईक्स आणि जवळपास 600 रिट्विट्स मिळाले आहेत. काही युजर्सनी हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. नूडल्स तयार करण्याची पद्धत अत्यंत घाणेरडी आणि अस्वच्छ असल्याचे म्हटले आहे. तर काही यूजर्सनी हा व्हिडिओ अत्यंत मनोरंजक असल्याचे म्हटले आहे.