Indian Railways (Photo Credits: PTI)

कोरोना (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषित केले होते. परिणामी, व्यवसाय, उद्योगधंदे आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मात्र, देशात गेल्या काही महिन्यांपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. देशातील परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर येत आहेत. तसेच येत्या 1 एप्रिलपासून रेल्वेसेवा (Railway service) पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार असल्याची बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) एका महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रसार माध्यमांत दाखवण्यात येत असलेल्या बातमीत तथ्थ नसल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सर्व रेल्वे पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. सध्या रेल्वेकडून श्रेणीबद्धरित्या रेल्वेंची संख्या वाढवली जात आहे. आधीपासूनच 65 टक्क्यांपेक्षा अधिक रेल्वे धावत आहेत. यातच जानेवारी महिन्यात यात 250 गाड्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच यात हळूहळू गाड्या वाढवल्या जातील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Fact Check: मोदी सरकार 'प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास योजने' अंतर्गत प्रत्येकाला 1 लाख रुपयांचे वाटप करत आहे; जाणून घ्या सत्य

ट्विट-

प्रसार माध्यमांमध्ये रेल्वेशी निगडीत बातम्या दाखवल्या जात आहेत. तसेच येत्या एक एप्रिलपासून सर्व प्रवाशी रेल्वे पूर्ण क्षमतेने धावतील, असा दावा केला जात आहे. रेल्वेने लोकांना व माध्यम संस्थांना रेल्वे सेवेबद्दलच्या अशाप्रकारचे अंदाज वर्तवू नयेत, असे आवाहन केले आहे.