'नीरव मोदी'च्या Ostrich Hide Jacket लूकची सोशल मीडियात चर्चा, 8-10 लाखाच्या या जॅकेट्समध्ये असं नेमकं काय आहे?
Nirav Modi's Ostrich Hide Jacket (Photo Credits: The Telegraph | Twitter)

भारतामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा (PNB Scam) तब्बल १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली असलेला व्यावसायिक नीरव मोदी (Nirav Modi) फरार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहेत. लंडन (London)  येथे द टेलिग्राफ (The Telegraph Newspaper)  या वृत्तपत्रकाच्या एका प्रतिनिधीने नीरव मोदीला गाठून काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने केवळ ' No Comments' असे उत्तर दिले. त्यानंतर तो टॅक्सी पकडून तिथून निघून गेला. भारतामध्ये घोटाळा करून लंडनमध्ये पळून गेलेला नीरव मोदी आलिशान जीवनशैली जगत असल्याचं यावेळी दिसून आलं. लंडनमध्ये फिरताना नीरव मोदीने Ostrich Hide jacket घातले होते. हे जॅकेट तब्बल 9 लाखाहून अधिक किंमतीचे असल्याने सध्या सोशल मीडियात निरव मोदींच्या लूकची चर्चा सुरु आहे. PNB SCAM: लंडन मधील रस्त्यांवर दिसला नीरव मोदी, घोटाळ्यासंबंधित प्रश्न विचारल्यास उत्तर देण्यास नाकारले

नीरव मोदीच्या जॅकेटची का होतेय इतकी चर्चा?

लंडनमध्ये दिसलेला नीरव मोदी केस वाढवलेले, पिकलेली दाढी, खास स्टाईलमध्ये वाढवलेली मिशी आणि त्यासोबतच Ostrich Hide jacket मध्ये दिसला. Ostrich leather हे जगातील महागड्या लेदर जॅकेट्स पैकी एक आहे. पोल्का डॉट्स प्रमाणे त्याचं डिझाईन असतं. Ostrich म्हणजे शहामृग. पूर्वी शहामृगाच्या कातडीपासून मिलिट्रीचे कपडे बनवले जात असे. मात्र त्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि महागडी असल्याने सध्या केवळ फॅशन जगतामध्ये या लेदरला विशेष मागणी आहे. हे लंडन दीर्घकाळ टिकतं, क्रॅक पडणं , शुष्क होणं अशापासून हे लेदर सुरक्षित असल्याने थंडीच्या काळात संरक्षण करण्यासाठी त्याचा फायदा होतो. परिणामी फॅशन जगतात 'हाय क्लास स्टेटस' दाखवण्यासाठी अनेक नावाजलेले ब्रँड त्याचा वापर करतात. किमान 8-10 लाख इतकी या जॅकेटची किंमत असल्याने नीरव मोदींच्या अंगावर हे जॅकेट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सोशल मीडियामध्ये काय होत्या प्रतिक्रिया?

भारत सरकारने नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो लंडनमध्ये दिसला म्हणून त्याला लगेच पकडता येणार नाही. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रकिया सुरु आहे. लंडन सरकारसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.