'भाऊ' म्हणून गर्लफ्रेंडच्या सासरी आला प्रियकर, लग्नघरातून 2 दिवसात नववधू बॉयफ्रेंडसोबत सार्‍यांदेखत पसार
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

दिवाळी नंतर आता भारतामध्ये लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोझाबाद मध्ये चक्क गर्लफ्रेंडला पुन्हा मिळवण्यासाठी एका तरूणाने अजब धाडस केल्याची घटना समोर आली. प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं या नियमानुसार, नुकत्याच लग्न झालेल्या गर्लफ्रेंडच्या सासरी प्रियकराने 'भाऊ' बनत प्रवेश केला. त्यानंतर पुढील 2 दिवसातच नववधू त्याच्या बॉयफ्रेंड सोबत पसार झाली आहे. घरात नववधू आणि तिचा 'भाऊ' गायब असल्याचं घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली मात्र ते कुणालाच सापडले नाहीत. त्यानंतर वर पक्षाकडून वधूच्या घरच्यांना हा सारा प्रकार सांगितल्यानंतर ते देखील गावामध्ये हजर झाले.

25 नोव्हेंबरला विवाह पार पडला. लग्नाचे विधी संपवून नववधू सासरी आली. लग्ना नंतरच्या विधींमध्ये प्रियकराने आपण वधूचा भाऊ असल्याचं सांगत प्रवेश मिळवला. त्यानंतर लग्नाच्या धामधूमीत सारे कुटुंबीय व्यग्र असताना संधी साधत नववधू प्रियकरासोबत घरातून पळून गेली. यावेळेस लग्नात मिळालेले सारे सोन्याचे दागिने घेऊन या दोघांनी धूम ठोकली आहे. Wedding season begins: डिसेंबर महिन्यातील लग्नासाठीचे 'हे' आहेत शुभ दिवस .

अमर उजालाच्या रिपोर्ट्स नुसार पळून गेलेल्या वधूच्या पतीने या प्रकराचि पोलिस तक्रार केली आहे. वधूच्या आईने देखील एक स्वतंत्र तक्रार नोंदवली आहे. पहिल्यांदा पोलिसांनी या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी तयारी दर्शवली नाही. त्यानंतर दोघांनी पुन्हा पोलिस स्टेशन गाठत तिचा शोध घेण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी मागणी केली. Shikohabad पोलिस स्टेशन मध्ये नंतर पोलिसांनी त्यांना वधू आणि तिच्या प्रियकराला शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं आश्वासन दोन्ही कुटुंबियांना दिलं आहे.