न्यूझीलंड सरकारने (New Zealand) सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरूद्ध लढा जिंकल्यानंतर जगभरातुन या देशाचे कौतुक होत आहे. यात आता आणखीन एक कारण जोडले गेले आहे. लैंगिक शिक्षणाचे (Sex Education) महत्व सांगण्यासाठी न्यूझीलँड सरकारने एक अत्यंत पुढारलेला उपक्रम राबवला आहे. अलिकडेच 'Kill It Real' या ऑनलाईन मालिकेचा भाग म्हणुन एक जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, अश्लील कंटेंट आणि याचा अल्पवयीन मुलांवर होणारा परिणाम याकडे लक्ष देणारी आहे. या जाहिरातीमध्ये दोन खरे पॉर्न स्टार (Porn Star) एका महिलेला तिचा मुलगा XXX व्हिडीओ ऑनलाइन पाहात असल्याचे सांगतात, मात्र ही आई त्या मुलावर न चिडता त्याला समजवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करताना दाखवली आहे. ही समज देण्यासाठी कोणती आणि कुठे मदत मिळेल हेही या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. ही जाहिरात बघून अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले आहे.
सरकारच्या या सद्य जाहिरातीचे उद्दीष्ट म्हणजे पालकांना मुलांना अश्लील गोष्टींबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करणे आणि हे पॉर्न व्हिडीओज आणि वास्तव यात काय फरक आहे हे समजावण्यासाठी प्रेरणा देणे असा आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून विशेषतः सेक्स संबंधात संमती आणि आदर या विषयावर देखील भाष्य करण्यात आले आहे. Porn Vs Real Life Sex: पॉर्न आणि खऱ्या आयुष्यातील सेक्स मध्ये आहेत 'हे' मोठे फरक; चुकूनही करू नका दोन्हींची तुलना
पहा हा व्हिडीओ
हा व्हिडीओ ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे जिथे याला 2.8 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 22,000 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. या जाहिरातीवरील काही प्रतिक्रिया पहा.
पहा ट्विट
I just love the mothers reaction here.
She don't scream, she don't get angry.
She knows her kid is growing up, gets curious.
He just needs education. That is all.
— The Hollow Ten (@Tnecwin) June 12, 2020
AWESOME! Great message, nice talk of consent, and effective.
— Kat Morgan (@ktkm) June 14, 2020
the most useful sex-ed yet. Whoever was responsible for this ad should be congratulated.
— Solgrayne the Swamp Creature (@solgrayne) June 13, 2020
This is perfection on many levels. Love it
— TheeCannabish (@HillyBlaze) June 13, 2020
This is hilarious but informative though
— Senior Mgbeke ☺️ (@_chiomasylvia) June 13, 2020
Oh my... This is such a good ad.
— Rindi (@cthwnd) June 13, 2020
ही जाहिरात बघून अनेकांनी कौतुक केले आहे यात दाखवलेली आईची भूमिका पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. सुद्न्य पालकांकडूनही अशीच वागणूक अपेक्षित आहे. न्यूझीलँड सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक आहे. काळाची गरज ओळखून हा एक स्तुत्य उपक्रम सरकारने हाती घेतला आहे असे अनेक जाहिरात तज्ञांनी म्हंटले आहे.