सोशल मिडियाच्या वापरामुळे लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. ज्या प्रकारे लोक आपले विचार या ठिकणी प्रकट करतात, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अनेक क्षणही इथे एकमेकांसोबत शेअर करत असतात. फेसबुक सारख्या माध्यमावर तर लोकांना नेहमीच काही हटके गोष्टी करण्यास प्रोत्साहन मिळत असते. लॉक डाऊनमध्ये फेसबुकवर अनेक ‘चॅलेंजेस’ व्हायरल झाले होते, आताही असेच एक चॅलेंज इथे धुमाकूळ घालत आहे ते म्हणजे #आयुष्य_भराचा_जोडीदार_challenge. या ‘चॅलेंज’ मध्ये लोक आपल्या जोडीदारासोबतचे फोटोज शेअर करत आहेत.
या ‘चॅलेंज’ला नुकतीच सुरुवात झाली असून, #आयुष्य_भराचा_जोडीदार_challenge या हॅश टॅगअंतर्गत हजारो लोकांनी आपल्या जोडीदारासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये अगदी नवपरिणीत जोडप्यांपासून ते चाळीशीमधील कपल्सनी आपापले फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाला काही वर्षे झाले असलेल्या जोडप्यांनी आपल्या मुलांसोबतचे फोटोही पोस्ट केले आहेत.
चला पाहूया अशा काही फोटोंची झलक -
(हेही वाचा: मुंबई करांना लोकल प्रवासाची मुभा मिळताच पहिल्या दिवशी CSMT स्टेशन मध्ये पहा काय आहे स्थिती (Watch Video))
दरम्यान, पती-पत्नी हे नाते असे आहे की जिथे नेहमीच मनातील भावना व्यक्त करण्याची गरज नसते. कधी कधी तुमची एखादी कृतीही बरेच काही सांगून जाते. फेसबुकवरचे सध्याचे हे ‘चॅलेंज’ असेच आहे. जोडीदारावरचे प्रेम व्यक्त करायला तुम्हाला I Love You म्हणायची गरज नाही, तर आपल्या जोडीदाराचा एक फोटो आणि सोबत ‘आयुष्य_भराचा_जोडीदार’ हॅश टॅग खूप काही सांगून जातो. तर हे चॅलेंज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, तुम्ही पोस्ट केलात का तुमच्या जोडीदारासोबतचा फोटो?