VI ad video (Photo Credits: Twitter)

कालपासून तुम्ही जर टीव्ही चॅनेल सर्फिंग करत असाल तर व्होडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू Vi हा ब्रॅन्ड लॉन्च केला आहे, त्याची एक जाहिरात सुरू आहे. दरम्यान त्यामध्ये सतत केवळ Vi.. Vi.. असंच म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेकजण कंटाळले आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण घरीच आहेत. टीव्ही सुरूच आहे आणि कोणतही चॅनेल असेल तरी लोकांना ही अ‍ॅड ऐकायला मिळत असल्याने लोकं त्रस्त झाले आहेत. काही याला 'Irritating जाहिरात' म्हटलं आहे. टेलिव्हिजनवर ही जाहिरात प्रसारित होत असली तरीही लोकांना सातत्याने ती कानावर पडत असल्याने त्याला वैतगलेल्या अनेकांनी सोशल मीडियात आपला त्रागा मांडला आहे. आणि मजेशीर ट्वीटसच्या माध्यमातून राग देखील व्यक्त केला जात आहे.

Vi जाहिराती विरूद्ध धम्माल मिम्स

 

धमकी

टीव्ही फोडणार?

 

किती इवळत असतात vi vi

VI ची जाहिरात थांबवा

 

 

View this post on Instagram

 

😂😂😂😂 Cr-@chilling_meme

A post shared by आम्ही Memekar (@aamhimemekar) on

2018 सालीच आयडिया आणि व्होडाफोन कंपनी एकत्र आल्या होत्या. मात्र काल पहिल्यांदा त्यांनी रिब्रॅन्डिंग करत व्होडाफोन मधून V आणि आयडियाचा I एकत्र करून Vi हा ब्रॅन्ड बनवला आहे. कालच त्यांनी दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांना नव्या साईटवर रिडिरेक्ट केले आहे. आता हा ब्रॅन्ड जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी संध्याकाळपासून जाहिरात सुरू झाली आहे. पण ती फारशी लोकांना रूचलेली नाही.

काही वर्षांपूर्वी व्होडाफोनने झू झू हे कॅरेक्टर आणले होते. ते जगभरात प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यातुलनेत Vi वर टीका होत आहे.