सोशल मिडिया अनेकदा या ना त्या गोष्टींवर बंदी आणल्याच्या खोट्या बातम्या व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र लॉकडाऊन काळात या गोष्टींना तर प्रचंड उधाण आलय. यात सध्या आणखी एका व्हायरल बातमीचे सत्य पुढे आले आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा चित्रपट टिपू सुलतान (Tipu Sultan) जो काही ठिकाणी 'Tippu Sultan' तर काही ठिकाणी 'Sher-e-Mysore: Tippu Sultan, India's First Freedom Fighter' या नावाने सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी नेटिझन्सकडून होत आहे अशी बातमी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
शाहरुख खानने हा चित्रपट स्विकारला कारण त्याचीही 'जिहादी' मानसिकता आहे अशा आशयाचे एक पोस्ट फेसबुक 35,000 लोकांनी शेअर केले आहे. नेमकं काय आहे या पोस्टर मागचे सत्य?
Fact Check:
फेसबुक व्हायरल झालेले 'टिपू सुलतान' हे पोस्टर फोटोशॉप मध्ये करण्यात आले आहे. अशा प्रकारचे कोणतेही पोस्टर शाहरुखने वा अन्य कोणत्याही दिग्दर्शकाने आतापर्यंत प्रसिद्ध केले नाही. हजारो लोक अशा पद्धतीची चुकीची बातमी पसरवत आहे. World Music Day: शाहरुख खान च्या चक दे इंडिया सिनेमाचं शीर्षक गीत तब्ब्ल 7 वेळा नाकारलं होतं, संगीतकार सलीम- सुलेमान यांनी शेअर केला खास किस्सा
पाहा पोस्ट:
अन्य पोस्ट:
आणखी एक पोस्ट
वाचा ट्विट:
भक्तों आपको क्या लगता हैं??
इसका बहिष्कार होना चाहिए या नहीं.??
अपना जवाब रीट्वीट करके जरूर दे..!!! pic.twitter.com/JfRCjztRol
— किरन जैन ( देशभक्त ) 🇮🇳 (@JainKiran6) May 4, 2020
या पोस्टवरुन अनेकांना प्रश्न पडला असेल की टिपू सुलतान नावाचा शाहरुखटा चित्रपट येणार आहे की नाही? मुळात हे पोस्टरचं फेक असल्यामुळे हा चित्रपट बॅन करण्याचा प्रश्नच येत नाही.
शाहरुख खान दिग्दर्शक आनंद एल राय च्या 'झिरो' या चित्रपटात झळकला होता. जो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यानंतर शाहरुखने कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केली नाही.