Narendra Modi Birthday: नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी YouTuber Fan अनमोल बकाया ने 24 तास केला 'मोदीजी' म्हणत जप (Watch Video)
Fan Chants Modiji For 24 Hours (Photo Credits: Youtube)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंचा आज, 17 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस संपन्न होत असताना त्यांंच्या एका फॅनचा एक हटके उपक्रम सुद्धा पुर्ण होतोय. न्युज 18 च्या माहितीनुसार आज मोदींंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनमोल बकाया (Anmol Bakaya) या त्यांंच्या युट्युबर फॅनने संपुर्ण 24 तास मोदीजींंच्या नावाचा जप करायचा विक्रम केला आहे. अनमोल हा मोदींंचा फॅन आहे, त्यांंच्या विषयी अनमोलच्या मनात बराच आदर आणि प्रेम आहे याच भावना मोदींंपर्यंत पोहचवण्यासाठी काहीतरी हटके करायचे असे अनमोल ने ठरवले होते आणि त्यासाठीच आजचा मोदींचा वाढदिवसाचा मुहुर्त त्याने निवडला आणि अशा प्रकारे आपल्या युट्युब चॅनेल वर 24 तास सलग मोदीजी नावाचा जप करुन त्याने मोदींंना शुभेच्छा दिल्या आहेत. PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरत येथील बेकरीमध्ये बनवला तब्बल 71 फुट लांब, 771 किलोचा केक

आपल्या या हटके व्हिडिओ विषयी अनमोल सांंगतो की, "मागील वर्षात मी आपल्या आदरणीय पंतप्रधानांबद्दल बर्‍याच सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ऐकल्या आहेत, परंतु वैयक्तिकरित्या मला त्यांच्याबद्दल अपार आदर आहे त्यांनी आपल्या देशासाठी जे केले आहे, त्या साठी माझे समर्थन आहे आणि ते कधीही न संपणारे आहे त्यांंच्या कौतुकासाठी हा माझा आजचाअ उपक्रम होता बाकी काही नाही". अनमोल ला हा व्हिडिओ मोदींंपर्यंंत पोहचवायचा आहे त्यामुळे सर्वांनी शेअर केल्यास त्याला मदत होईल असे त्याने आपल्या व्ह्युअर्स ना आवाहन केले आहे.

अनमोल बकाया 24 तास मोदीजींंचा जप व्हिडिओ

दरम्यान, आज मोदींंच्या वाढदिवशी भाजपकडुन देशभर रक्तदान, मास्क वाटप अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, देशविदेशातील नेत्यांंनी मोदींंना शुभेच्छा दिल्या आहेत.