सामाजिक संदेश देत असताना मुंबई पोलीस (Mumbai Police) नेहमीच हटके शेलीचा वापर करताना दिसतात. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवरही अशाच काहीशा मनोरंजनात्मक पोस्टद्वारे सामाजिक संदेश आढळतो. हे संदेश केवळ सामाजिकच नसतात तर कलात्मक आणि तितकेच मनोरंजकही असतात. सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा काळ आहे. अशा काळात सातत्याने हात धुणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन संदेश दिला आहे. हा संदेश देताना अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ (Agneepath ) चित्रपटातील एका दृश्याचा वापर करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 1990 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्निपथ या चित्रपटातील एका दृश्याचा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) आणि नीलम कोठारी (Neelam Kothari) यांच्यासह दिसतात. या व्हिडिओत हे तिन्ही कलाकार जेवण करताना हात धुण्याबाबत बोलताना दिसतात. याच व्हिडिओचा वापर सामाजिक संदेश देताना मुुंबई पोलिसांनी केला आहे. (हेही वाचा, Mumbai Police Best Tweets: ट्विटरवर 5 वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी शेअर केले आपले सर्वोत्कृष्ट ट्विट्स, Watch Video)
View this post on Instagram
व्हिडिओत आपण पाहू शकता जेव्हा अमिताभ बच्चन जेवण करणयास सुरुवात करतात. तेव्हा रोहिणी हट्टंगडी या त्यांना रागे भरतात. रोहिणी हट्टंगडी यांनी अग्निपथ चित्रपटात अमिताभ यांच्या आईची भूमिका केली आहे. त्या बच्चन यांना जेवणापूर्वी हात धुण्यास सांगताना दिसतात.
मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेला हाव्हिडिओ आतापर्यंत सुमारे 36, 000 पेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6,500 पेक्षाही अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.