April Fool’s Day 2021: Mumbai Police नी देखील  एप्रिल फूल  डे चं औचित्य साधत विना मास्क फिरणार्‍यांसाठी शेअर केली पोस्ट
(Photo Credits: Mumbai Police)

1 एप्रिल हा दिवस जगभर April Fool’s Day म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची नेमकी सुरूवात कशी झाली याची काही ठोस कहाणी नाही पण हा दिवस एकमेकांवर निखळ विनोद करत, एकमेकांची थट्टा मस्करी करत सेलिब्रेट करण्याची रीत आहे. या दिवसाच्या निमित्त प्रॅन्क देखील केले जातात. मग मुंबई पोलिसांनी देखील या दिवसाची संधी सोडलेली नाही. पण यंदा 1 एप्रिल 2021 चं औचित्य साधत मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा सल्ला देणारा प्रॅन्क शेअर केला आहे. मुंबई शहरातील वाढती कोरोनारूग्ण संख्या पाहता मुंबई पोलिसांनी नागरिकांना 'मास्क वापरण्याचं' आवाहन करण्यासाठी April Fool’s Day Prank केला आहे. April Fool's Day 2021 Marathi Jokes: एप्रिल फुल डे निमित्त Funny Messages, Images, GIf's शेअर करुन द्या मित्रांना गंमतीशीर शुभेच्छा!

दरम्यान मुंबई पोलिसांचं ट्वीटर अकाऊंट हे चांगलंच अ‍ॅक्टिव्ह आहे. यामध्ये नागरिकांना ऑनलाईन मदत करण्यासोबतच समाजातील विविध घटनांवर, प्रश्नांवर अनोख्या अंदाजात मुंबई पोलिसांकडून भाष्य केले जातात. कोविड काळातही अनेक टीव्ही मालिका, पात्रं आणि गाण्यांच्या माध्यमातून कोविड 19 गाईडलाईनचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई पोलिस ट्वीट

मुंबई पोलिस सीपी ट्वीट

मुंबई पोलिस सीपी यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून देखील 'कोरोनाला 'फूल' करूया- मास्क लावूया!

केवळ एप्रिलमध्येच नाही तर आपण कोरोनावर पूर्णपणे मात करत नाही तोपर्यंत मास्क लावणे आवश्यक आहे.' या मेसेज सह खास ट्वीट करण्यात आलं आहे.

मुंबई शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक बनत चालली आहे. काल मुंबई मध्ये पुन्हा 24 तासांत 5 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. तर महाराष्ट्रात काल रात्रीपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे.