MSBSHSE Class 10 Result 2019: 8 जूनला यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लागला. यंदाचा दहावीचा निकाल मागील 13 वर्षांतील सर्वात कमी निकाल लागल्याने चर्चेत आहे. यंदाच्या निकालातील अनेक गोष्टी चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे सगळ्या विषयात 35 गुण मिळवणारा अक्षित जाधव (Akshit Jadhav). सहाही विषयात 35 गुण मिळवत 35% वर पास होणारा अक्षित हा राज्यातील एकमेव विद्यार्थी आहे.
अक्षित जाधवचा निकाल
मिरा रोड येथील अक्षित जाधव या विद्यार्थ्यांने सार्या विषयात 35% गुण मिळवण्याची कमाल केली आहे. त्या या अनोख्या विक्रमाचं त्याने मित्रमंडळींसोबत सेलिब्रेशनही केलं आहे. अक्षित हा शांती नगर हायस्कूलचा (Shanti Nagar High School) विद्यार्थी आहे.
यंदा महाराष्ट्र राज्याचा बोर्डाचा दहावीचा निकाल 77% लागला आहे. कोकण विभागासह यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मात्र नव्या गुणपद्धतीमुळे दहावीचा निकाल 10-12% गडगडल्याचं चित्र आहे.