मुंबई:  माटुंगा भागात भाजी विक्रेत्याला मारहाण प्रकरणी 3 जण अटकेत; Viral Video नंतर कारवाई
Matunga Viral VIdeo| PC: Twitter/ANI

मुंबईच्या माटुंगा मार्केट (Matunga Market) मध्ये एका भाजी विक्रेत्याला मारहाण झाल्याप्रकरणी 3 जण अटकेत आहेत. दरम्यान सध्या भाजी विक्रेत्याला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. या वायरल व्हिडीओ मध्ये भाजी विक्रेता दुकानात असल्याचं पहायला मिळत आहे. अचानक तिथे 3 जण येतात. त्यापैकी दोन जण दुकानासमोर येऊन काही करत आहेत. तर तिसरी व्यक्ती थोड्या अंतरावर फोनवर बोलत आहे. दोन्ही आरोपी भाजी विक्रेत्यासोबत वाद घालत दुकानात शिरले. आणि दुकानात आल्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

दरम्यान भाजी विक्रेत्याला होत असलेली मारहाण पाहून रस्त्यावरील लोकं भाजी विक्रेत्याच्या मदतीला धावले. त्यांनी विरोध केला. भाजी विक्रेत्यांने अनेकदा माफी देखील मागितली पण त्याला जबरदस्त मारहाण झाली. TV9 Marathi च्या रिपोर्ट्सनुसार या प्रकरणी उदयकुमार नाडर, बाळकृष्ण नाडर, आणि रमेश यांना अटक झाली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.  (Mumbai: डिलिव्हरी बॉयला मारहाण,समतानगर परिसरातील शिवसेना शाखाप्रमुखासह इतरांवर गुन्हा).

माटुंगा वायरल व्हिडिओ

मीडीया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, एका आरोपीने दुकान भाडेतत्त्वावर घेतलं होतं. हा तरूण तेथे काम करत होता. काही काळाने त्यानेच मालकाकडून स्वतः दुकान भाड्याने चालवायला घेतलं होतं. त्यानंतर जी मारहाण झाली आहे. हा व्हिडीओ 22 ऑगस्ट म्हणजे काल रक्षाबंधनाच्या दिवसाचा आहे.