Nightclub | | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

लखनऊ येथील एका नाईट क्लबमध्ये (Lucknow Nightclub Mujra Video) आयोजित करण्यात आलेल्या कथीत मुजरा कार्यक्रमावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. कथीत मुजरा परफॉर्मन्स होत असतानाचा एक व्हिडिओ सोशल (Mujra Viral Video) मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, 33-सेकंदाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे. सदर मुजरा कार्यक्रमासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, या कार्यक्रमात अश्लिलतेचा कळस गाठण्यात आला. जाममध्ये मुजरा सुरु होता. सोबतच दारुपार्टी आणि पैशांची उधळणही सुरु होती, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. गजबजलेल्या विभूती खांड परिसरातील एका क्लबमध्ये हा प्रकार सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर नाईट क्लब बंद केल्याचे समजते.

सोशल मीडियावर टीकेची झोड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर फिरणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लाल पोशाख घातलेली एक महिला "शराबी" चित्रपटातील गाण्यावर मुजरा नृत्य करताना दिसते आहे. दरम्यान, पांढऱ्या कार्पेटवर तिच्याभोवती बसलेले पुरुष दारूचे सेवन करताना दिसत आहेत. तिच्यावर पैशांची उधळणही होते आहे. सोशल मीडियावर हे दृश्य पाहून जोरदार टीका केली जात आहे. एका युजर्सने म्हटले आहे की, हे दृश्य सिनेमॅटिक चित्रणापेक्षा लखनौच्या समिट बिल्डिंगच्या नाईटलाइफ दृश्याचे वास्तव प्रतिबिंबित करते. (हेही वाचा, Spain Night Club Fire Video: स्पेनमधील नाईट क्लबला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू, Watch Video)

पोलिसांकडून कारवाईचे संकेत

दरम्यान, विभूती खांडचे एसएचओ सुनील कुमार सिंग यांच्यासह अधिकाऱ्यांनी, व्हिडिओमध्ये चित्रित केलेल्या संभाव्य उल्लंघनांची पुष्टी केलीआहे. कार्यक्रमाची परवानगी न घेणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन करणे आणि इतर काही नियमांचा भंग आणि कायदा मोडले प्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सुनील कुमार सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (हेही वाचा, An Evening in Macau: 'मकाऊ येथील रात्र, पिक्चर अभी बाकी है'; संजय राऊत यांचा इशारा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा)

 सोशल मीडियावर कार्यक्रमाची जाहीरात

सांगितले जात आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाईटक्लबच्या "मुजरा " कार्यक्रमाची जाहिरात केली जात होती. सुरुवातीला सामान्य नागरिक आणि पोलिस यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. मात्र, जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल होताच याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. काही नागरिकांनीही पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजते.

व्हिडिओ

टीका आणि सोशल मीडियावर संताप वाढल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून उत्तर प्रदेश उत्पादन शुल्क विभागाने प्रकरणात त्वरीत हस्तक्षेप केला. एका अधिकृत ट्विटद्वारे विभागाने वायरल व्हिडिओच्या संदर्भात बारचा परवाना निलंबित करण्याची घोषणा केली. त्यानंतर, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी नियामक मानके आणि सार्वजनिक शालीनता राखण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर जोर देत नाईट क्लबवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले.