Mouse Fight a Snake: उंदराला घाबरला साप, जीव वाचवण्यासाठी भक्ष्य सोडून घुसला झुडपात
Mouse Fight a Snake | Photo Credits: You Tube)

अन्नसाखळीमध्ये उंदीर (Rats) हे सापाचे भक्ष्य आहे हे सर्वांच माहिती आहे. त्यामुळे सहाजीकच उंदीर हे सापाला नेहमी घाबरुन असतात. सापाची कोठे चाहूल जरी लागली तरी उंदीर घाबरुन थरथरतात किंवा आश्रयासाठी वेगळी वाट पकडतात. पण, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि तो कधीचा आहे याबाबत फारशी माहिती नाही. पण व्हिडिओत एक साप चक्क उंदराला घाबरुन पळताना दिसतो आहे. साप उंदराला इतका घाबरला आहे. की ,जीव वाचविण्यासाठी तो चक्क आपल्या तोडातील भक्ष्य सोडून झुडपात आश्रय घेताना दिसतो आहे.

उंदीर सापाची ही लढाई खरेतर उंदराच्या पोटच्या पिल्लामुळे पाहायला मिळाली आहे. भक्ष्याच्या शोधात सरपटत निघालेल्या एका सापाला उंदराचे एक पिटूकले दिसते. हे पिटूकले अगदीच लहान असल्याने अगदीच सहजपणे सापाच्या तावडीत सापडते. या पिटूकल्याला भक्ष्य म्हणून तोंडात पकडून हा साप गिळण्याचा प्रयत्न करत असतो. बरे झाले आपल्याला शिकार सापडली, असा विचार साप बहुदा करत असावा. इतक्यात आपल्या पिटूकल्याला सापाने पकडल्याचे एका मोठ्या उंदराला दिसते. हा मोठा उंदीर या पिटूकल्याची आई किंवा वडील असावा अशी शक्यता आहे.

ट्विट

दरम्यान, पिटूकल्याला सापने पकडल्याच पाहताच उंदीर रागे भरतो. क्षणाचाही विलंब न लावता हा चिडलेला उंदीर चक्क सापावर हल्ला करतो. उंदराकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सापही गांगरतो. घाबरतो. तोंडातील भक्ष्य म्हणजेच उंदराचे पिटूकले जागेवर सोडून लगेच सैरावैरा धावत सुटतो. अगदी जीवाच्या अकांतानाे तो रस्त्याकडेच्या झुडपात लपतो.