Moneky Rescues Baby (Photo Credits: @ParveenKaswan Twitter)

आई ही आईच असते. तिचे प्रेम आणि त्या प्रेमाची ताकद फार मोठी असते, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. याचाच प्रयत्य देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक माकडीण आपल्या बाळाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता केबल वायरवर झेप घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माकडीण काही वेळ इमारतीच्या गच्चीच्या कडेला बसलेली दिसत आहे. केबलवर अडकलेल्या आपल्या बाळाला वाचवण्यासाठी खूप वेळ प्रयत्न करते मात्र यश येत नसल्याने अखेर ती केबलवर झेप घेत आहे. अनेक प्रयत्नांनंतर तिच्या धडपडीला यश येते आणि बाळाला घेऊन ती इमारतीवर उडी मारताना व्हि़डिओत पाहायला मिळत आहे. माकडीणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

माकडीणीच्या या अथक प्रयत्नांचा व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, "एका आईचे रेक्स्यू ऑपरेशन... आणि ते कसे चुकू शकते?" (दलदलीत अडकलेल्या तरुणाला माकडाने दिला मदतीचा हात; रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा 'हा' फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल)

पहा व्हिडिओ:

पहा नेटकऱ्यांच्या कमेंट्स:

हा व्हिडिओ पाहून माकडीणीचे कौतुक होत आहेच. पण तिच्यातील आईपणं नेटकऱ्यांना अधिक भावले आहे. आई आणि बाळ यांच्या नात्यात माणूस आणि प्राणी असा भेद नाही. आईपणाची भावना माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही तितकीच तीव्र असते, हे या व्हिडिओतून पुन्हा एकदा अधोरेखित होते. या व्हिडिओवर भावूक कमेंट्स होत असून काही मजेशील कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. बाळाला नंतर आईचा मार खावा लागला असेल, अशाही प्रतिक्रीया व्हिडिओखाली पाहायला मिळत आहेत.