Most Expensive Beer in History: जगातील सर्वात महागडी बिअर 4.05 कोटींना विकली गेली; जाणून घ्या काय आहे खास
Most Expensive Beer (संग्रहित संपादित प्रतिमा)

तुम्ही महागड्या वाईन, शॅम्पेन, व्हिस्की, स्कॉचबद्दल अनेकदा ऐकले असेल, परंतु तुम्ही महागड्या बिअरबद्दल (Expensive Beer) ऐकले आहे? कदाचित नसेल. तर सध्या एका बिअरच्या बाटलीने जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले आहे, कारण ही जगातील सर्वात जुनी व सर्वात महागडी बिअर बाटली आहे. जगातील सर्वात जुनी बिअर ही साधारणपणे 140 वर्षांची आहे, जिचे नाव 'ऑलसॉप्स आर्क्टिक अले' (Allsopp’s Arctic Ale) असे आहे. ही बिअर इतकी जुनी असल्याने ती जगातील सर्वात महागडी बिअर ठरली आहे.

हे कोणते सामान्य पेय नसून त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे आणि म्हणूनच या बाटलीला कलाकृतीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पुरातन वस्तूंच्या व्यापारानुसार, ओक्लाहोमाच्या एका ग्राहकाने 2007 मध्ये ईबेवर ऑलसॉपच्या आर्क्टिक अलेची बाटली $304 मध्ये विकत घेतली होती. मॅसॅच्युसेट्सच्या किरकोळ विक्रेत्याने या बाटलीच्या त्याच्या वितरणासाठी $19.95 आकारले. (हेही वाचा: Woman Ate Bat Soup: वटवाघळाचं सूप प्यायल्याप्रकरणी थायलंडमधील महिलेला अटक; सोशल मीडियावर व्हायरल होतोय फूड ब्लॉगरचा 'हा' व्हिडिओ)

बाटलीवर पर्सी जी. बोल्स्टरच्या स्वाक्षरीसह एक जुनी, हाताने लिहिलेली लॅमिनेटेड नोट होती. त्यात त्यांना ही बाटली 1919 मध्ये सापडल्याचे लिहिले होते. ही बिअर थंडीच्या कडाक्यातही गोठू नये या उद्देशाने ती बाटली तयार करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, पत्रानुसार बिअर विशेषतः 1852 मध्ये खास ध्रुवीय प्रवासासाठी तयार केली गेली होती. 1852 मध्ये सर जॉन फ्रँकलिन आणि त्याच्या क्रूच्या शोधाच्या वेळी सर एडवर्ड बेल्चर यांनी आर्क्टिकमध्ये आणलेल्या गोष्टींमध्ये या बिअरचा समावेश होता. ही बाब खरेदीदाराच्या लक्षात आली होती व त्यामुळे त्याने ती विकत घेतली.

आता या बिअर लिलाव झाला. ही एक अशी बिअर आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 10 टक्क्यांच्या जवळपास ठेवण्यात आले आहे. eBay वर या बिअरच्या बाटलीसाठी 157 हून अधिक बोली लागल्या होत्या, पण शेवटी ती $5,03,300 मध्ये एका खरेदीदाराने विकत घेतली, जे अंदाजे 4.05 कोटी रुपये आहे.