लग्नात वधू-वर सप्तपदी चालून सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतात. परंतु लंडनमध्ये (London) असे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे लॉरेन वॉल (Lauren Wall) नावाच्या एका महिलेने आपल्या आईला स्वतःच्या हनीमूनवर सोबत नेले. पण यावेळी असे काहीतरी घडले जे आश्चर्यचकित करणारे आहे. तर हनिमूनला गेल्यावर नवरा आणि सासू एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाली की, घरी परत आल्यावर नवऱ्याने वॉलला घटस्फोट देऊन तिच्या आईशी म्हणजे आपल्या सासूशी लग्न केले.
mirror.co.uk च्या वृत्तानुसार, लंडनच्या टिकीनहॅममधील 34 वर्षीय लॉरेन आपला जोडीदार पॉलशी लग्न करून प्रचंड खुश होती. तिच्या आईनेही आपल्या मुलीच्या लग्नात 15 हजार पाउंड (जवळजवळ 14 लाख रुपये) खर्च केले होते. लॉरेन आणि पॉल बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नाआधीच त्यांना एक मूलही झाले होते. लग्नानंतर जेव्हा लॉरेन हनिमूनला गेली, तेव्हा तिने आईलाही सोबत घेतले. यावेळी, नवरा आणि आईमध्ये खूप चांगली केमिस्ट्री दिसून आली. दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतीत करत होते. पण या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे याबद्दल लॉरेनला काहीच शंका आली नाही. (हेही वाचा: कलयुग: मुलीच्या लग्नानंतर जावयाच्या 22 वर्षाच्या भावावर आईचा जडला जीव; लग्नगाठ बांधून झाली लेकीची थोरली जाऊ)
परंतु 8 आठवड्यांनंतर जेव्हा लॉरेनला सत्य कळले तेव्हा तिच्या पायाखालील जमिंच सरकली. त्यानंतर पती पॉल लॉरेनला सोडून आपल्या सासूसमवेत निघून गेला. इतकेच नाहीतर पुढे 9 महिन्यांनंतर आईने पॉलच्या मुलालाही जन्म दिला. याबाबत लॉरेन म्हणते, 'माझ्या बाबतीत जे घडले त्याबद्दल जेव्हा मला पहिल्यांदा समजले तेव्हा असे वाटले की जणू माझे जगच संपले आहे. ज्या आईने मला जन्म दिला आणि ज्या माणसावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच मला फसवले.'
ही घटना 2004-2005 मधील आहे. आज इतक्या वर्षानंतर लॉरेनने ही गोष्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.