'या' कारणामुळे गावात पुरुषांना बंदी, फक्त महिलांना प्रवेश
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

केनिया (Kenya) मधील उमोजा येथील गावात पुरुषांना बंदी आहे. तर फक्त महिलाराज असलेले पृथ्वीतलावरील एकमेव गाव आहे. या गावामध्ये कोणत्याही महिलेला राहण्यास परवानगी आहे.

1990 रोजी उमोजा गावाची स्थापना रेबेका लोलोसोली नावच्या महिलेने केली. त्यावेळी रेबेकासोबत 15 महिला  होत्या. तर हिंसाचार झालेल्या महिलांना या गावात राहण्यास परवानगी दिली गेली आहे. जास्त करुन ब्रिटिशांन सैनिकांनी बलात्कार केलेल्या महिलांचा जास्त समावेश या गावात आहे.

दागिने बनविणे हा या गावातील महिलांचा मुख्य व्यवसाय आहे. तसेच गावातील महिलांना लग्न आणि शारिरीक संबंध ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र गावाच्या वेशीबाहेर या सर्व गोष्टी करण्यास महिलांना मुभा दिली आहे.