काही दिवसांपूर्वीच एका वाईल्डलाइफ फोटोग्राफरने काढलेल्या काळ्या रंगाच्या बिबट्याचे (Black Leopard) फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील ताडोबा नॅशनल पार्क मध्ये सुद्धा काळ्या रंगाचा बिबट्या दिसल्याचे फोटो एका 24 वर्षीय फोटोग्राफर अनुराग गावंडे याने टिपले आहेत. अनुराग हा हरिणाचा शोध घेता होता पण तेव्हापासून त्याला काळ्या रंगाचा बिबट्या दिसला पाहिजे असे सातत्याने वाटत होते. याच दरम्यान, त्याने एका बिबट्याला रस्त्यावरुन जाताना पाहिले. त्याचवेळी एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता त्याने त्या काळ्या बिबट्याचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले. काळ्या रंगाचे बिबटे अत्यंत दुर्मिळ असून सहजासहजी दिसून येत नाहीत. मात्र बिबट्यांचे फोटो काढण्यासाठी सुद्धा तेवढेच धाडस लागते जेवढे त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला धडकी भरते.(Python Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु)
अनुराग याने दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आश्चर्यजनक जीवांच्या फोटोंची एक सीरिज क्लिक केली. खरंतर असा क्षण दिसणे सोप्पे नाही आहे. सोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो खुप लोकांनी लाईक केला आहे. कारण काळ्या रंगाचे बिबटे हे दिसणे म्हणजे मोठे भाग्यच समजले जाते. या काळ्या बिबट्यांबद्दल बहुतांश जणांना माहिती सुद्धा नसेल. तसेच त्याचे रहस्य सुद्धा जाणून घेण्यासाठी लोक त्याबद्दल सोशल मीडियात सर्च करत असतात. जगभरात एकूण किती काळ्या रंगाचे बिबटे आहेत त्याची संख्या सुद्धा कोणाला माहिती नाही. असे म्हटले जाते की, ते काही वेळेसच दिसून येतात. मेलिनिज्म हा अल्बानिज्मच्या विरुद्धा आहे. जेव्हा एखादा प्राणी मेलेनिस्टिक असतो त्यावेळी त्याच्यामध्ये एक विशिष्ट जीन त्वजा किंवा केसांमध्ये अतिरिक्त Pigment निर्माण करणारा असल्याने तो काळ्या रंगाचा दिसतो.
एका नव्या संशोधनानुसार, बिबट्या, चित्ता किंवा ओसेलोट्स सारखे काळ्या रंगाच्या मांजरींच्या प्रजातींमध्ये मेलेनिस्टिक रुपातील मानल्या जातात. काळ्या रंगाच्या माजंरींना रात्रीच्या वेळेस गुप्तपणे राहण्यास मदत होण्यास सोप्पे होते. मात्र उन्हात त्यांचे शरीर वेगाने गरम होते आणि ते काही प्रजातींना नष्ट सुद्धा करु शकतात.(Strange Creature Found in Bali: बाली येथे समुद्राच्या किनाऱ्यावर दिसला हिरव्या रंगाचा विचित्र जीव, 'या' दुर्लभ प्राण्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)
तसेच वाइल्डलाइफ फोटोग्राफर मिथुन एच यांनी भारतातील काबिनी फॉरेस्ट मध्ये साया नावाच्या काळ्या बिबट्यासह अजून एक क्लियोपेट्रा सोबत त्यांचे फोटो काढले होते. या कपल्सचे दुर्मिळ असे फोटो काही आठवड्यांपासून वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.