Strange Creature Found in Bali: बाली येथे समुद्राच्या किनाऱ्यावर दिसला हिरव्या रंगाचा विचित्र जीव, 'या' दुर्लभ प्राण्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
(Photo Credits: Twitter/Nature Is Scary)

Strange Creature Found in Bali: जगात आज सुद्धा असे काही रहस्य आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती सुद्धा नाही आहे. या रहस्यांमध्ये असे काही दुर्लभ जीव ही आहेत ज्यांच्या बद्दल आपण कधीच ऐकले किंवा पाहिले ही नाही आहे. सोशल मीडियात काही विचित्र जीवांचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहतो. जे कधीच आपण पाहिलेले नसतात. एका क्षणासाठी आपल्याला असे ही वाटेल की, या प्रकारचे जीव खरंच पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. याच पार्श्वभुमीवर समुद्रातील एक रहस्यमय असा जीव दृष्टीस पडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ बाली येथील समुद्र किनाऱ्यावरील असून तेथे एक हिरव्या रंगाचा चित्रविचित्र जीव रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे.

या दुर्लभ प्राण्याचा धक्कादायक व्हिडिओ Nature is Scary या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याचसोबत कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, बालीच्या समुद्र किनाऱ्यावर एक विचित्र जीव पहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ तुफान सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा जीव रेंगत असताना आपले तोंड मोठे उघडत असल्याचे पहायला मिळत आहे. या 15 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये समुद्र किनाऱ्यावरील एक पारदर्शी जिलेटिन प्राणी (Transparent Gelatinous Creature) दिसून येतो.(Crab Smoking Cigarette: सिगरेट च्या पाकीटावर धुम्रपानाने कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडाच स्वतः दिसला स्मोकिंग करताना, Watch Video Viral)

 

येथे पहा व्हिडिओ:

व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ मूळ 2016 मध्ये शूट करण्यात आला होता. पण आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये असे दिसून येत आहे की, हा जीव Melibe Viridis नावाने ओळखला जातो. हा एक मासांहरी समुद्री स्लग आहे. हा व्हिडिओ जरी जुना असला तरीही त्याचे हे विचित्र रुप पाहून युजर्स हैराण झाले आहेत.