महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे 12 वीचा निकाल लांबला होता. त्यामुळे विद्यार्थी, पालक प्रतिक्षेत होते. मात्र काल निकालाची तारीख जाहीर करुन शिक्षण मंडळाने ही प्रतिक्षा संपुष्टात आणली आहे. परंतु, निकालापूर्वीचा एक दिवस कसा असतो हे अनेकांनी अनुभवले आहे. हुरहुर, काळजी, चिंता या संमिश्र भावना एकत्र दाटून आल्याने पोटात गोळा आल्याचा अनुभव तुम्ही-आम्ही घेतला आहे. आता निकालाला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची हुरहुर अधिकच वाढली असेल, यात शंकाच नाही. दरम्यान HSC Results पूर्वीच्या भावना नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत.
सध्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीवर मग ती गंभीर असो किंवा नसो. त्यावर मीम्स बनवण्याची पद्धत रुढ झाली आहे. यापूर्वीही आपण अनेक गोष्टींवर मीम्स पाहुन हसलो असू. ते जोक्सही फॉरवर्ड केले असतील. आता बारावी निकालाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले मीम्स विद्यार्थ्यांचं टेन्शन काहीसं हलकं करतील यात कोणतंच दुमत नाही. (महाराष्ट्र बोर्ड 12 वी चा निकाल आज दुपारी 1 वाजता होणार जाहीर; mahresult.nic.in वर असा पहा रिझल्ट)
पहा मीम्स:
#12thExamResult le server now pic.twitter.com/eCuozxlzDc
— 💮Blue🌸 (@drishtooo) July 16, 2020
Few hours are remaining for the announcement of #12thExamResult
backbenchers be like: pic.twitter.com/o91dHzpt0J
— Prajwal Dudhatkar🌞 (@iamprajwal77) July 16, 2020
Few hours are remaining for the announcement of result
Le Backbenchers be like - pic.twitter.com/4CKLltGo0F
— Rahul Jamra (@rahul_jamra_) July 16, 2020
Parents Right now #12thExamResult pic.twitter.com/cLnMiBlRA6
— Ɱ💫 (@Madeelixious) July 16, 2020
Meanwhile relatives who are interested in my bezzati : pic.twitter.com/SwguE5MJQC
— Rahul Jamra (@rahul_jamra_) July 16, 2020
निकालावर मीम्स तयार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक परीक्षांच्या निकालापूर्वी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल केले आहेत. त्यामुळे निकालावर मीम्स तयार करणे ही एक परंपराच झाली आहे. असो, या मीम्समुळे क्षणभर का होईना तुमचा ताण हलका होईल आणि चेहऱ्यावर हास्य फुलेल. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी लेटेस्टली मराठीकडून खूप शुभेच्छा!